esakal | जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूचः सलग दुसऱ्या दिवशी तीनशेपार बाधीत 

बोलून बातमी शोधा

जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूचः सलग दुसऱ्या दिवशी तीनशेपार बाधीत }

जळगाव जिल्ह्यात गेल्या विस दिवसापासून रुग्णसंख्यात प्रचंड वाढ झाली आहे.

जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूचः सलग दुसऱ्या दिवशी तीनशेपार बाधीत 
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

 जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहरात तीनशे तीस कोरोना बाधितांची संख्या आली आहे. गुरूवारी साडेपाचशे तर शुक्रवारी ७७२ रुग्ण आढळून आल्यानंतर आज ६१० नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 

जळगाव जिल्ह्यात गेल्या विस दिवसापासून रुग्णसंख्यात प्रचंड वाढ झाली आहे. तर मार्चच्या पहिल्या दिवसापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांनी तर चार-पाचशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी मोठा उद्रेक झाल्यानंतर आज देखील कोरोना बाधितांचा मोठा आकडा आला आहे. आज ३ हजार २२० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ६१० नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६४ हजार ३२ वर पोचली आहे. तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दिवसभरात ३२७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५८ हजार २२२ झाला आहे. 
 
जळगाव शहर संसर्ग अधिक 
जळगाव शहरातील संसर्ग तीव्रतेने वाढत आहे. गुरुवारी, शुक्रवारी विक्रमी रुग्णसंख्या आल्यानंतर आज ६१० रुग्ण संख्या आली असून नोंद एकट्या जळगाव शहरात ३३० रुग्णसंख्या आली. तर भुसावळ तालुका ३८, जळगाव ग्रामीण ३०, अमळनेर ११, चोपडा ६७, पाचोरा २ व भडगाव ३, धरणगाव ४, यावल ४, धरणगाव १०, एरंडोल ३, जामनेर २, रावेर २७, पारोळा १६, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर २६, बोदवड १९ आणि इतर जिल्ह्यातील ३ रुग्ण आढळले.