esakal | कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​

जिल्ह्यात सोमवारी आरटीपीसीआरचे १०१७ व रॅपिड ॲन्टीजेनचे ७६०१ असे एकूण ८६१८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. 

कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असून दररोजच्या मृतांची संख्या पंधरापेक्षा जास्त नोंदली जात आहे. सोमवारीही १६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील बळींच्या आकड्याने अठराशेचा टप्पार पार केला. तर नवे १२०१ रुग्ण समोर आले व जवळपास तेवढेच म्हणजे ११९५ बरेही झाले. 

आवश्य वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 


जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दररोज अकराशे, बाराशे रुग्ण समोर येत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या १२ हजारांच्या जवळपास पोचली आहे. सोमवारी नव्या १२०१ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख ३ हजार ९ झाली असून दिवसभरात ११९५ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा ८९ हजार ४६०वर पोचला आहे. जिल्ह्यात सोमवारी आरटीपीसीआरचे १०१७ व रॅपिड ॲन्टीजेनचे ७६०१ असे एकूण ८६१८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. 

चौघा तरुणांसह १६ बळी 
गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात तीस व चाळीशीतील चौघा तरुणांसह १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव शहरातील तिघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बळींची संख्या १८०९ झाली आहे. 

आवर्जून वाचा- कोरोनोला कस हरवणार ! विकेंड लाॅकडाऊन संपताच बाजारात तोबा गर्दी 


जळगावात रुग्णवाढ कायम 
दररोजच्या रुग्णवाढीत जळगाव शहराचा अव्वल क्रमांक आहे. सोमवारी शहरात २१३ नवे रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंतची रुग्णसंख्या २६ हजार ८६५वर पोचली आहे. शहरातील २१० रुग्ण बरेही झालेत. 

अन्य ठिकाणचे रुग्ण असे :

जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ १२४, अमळनेर २२०, चोपडा १०४, पाचोरा ६९, भडगाव १५, धरणगाव ३६, यावल ६६, एरंडोल ८१, जामनेर ३३, रावेर १२२, पारोळा ९, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ५६, बोदवड ९, अन्य जिल्ह्यातील ९. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे