esakal | कोरोनोला कस हरवणार ! विकेंड लाॅकडाऊन संपताच बाजारात तोबा गर्दी 

बोलून बातमी शोधा

कोरोनोला कस हरवणार ! विकेंड लाॅकडाऊन संपताच बाजारात तोबा गर्दी 

पंधरा एप्रिलनंतर कडक लॉकडाऊन लागेल या भितीनेही नागरिकांनी किराणा व इतर सामानाच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती.

कोरोनोला कस हरवणार ! विकेंड लाॅकडाऊन संपताच बाजारात तोबा गर्दी 
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वपरी प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. त्यात गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस या दिवशी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी आज कोरोनाची र्निंबंध पायदळी तुडवीत गर्दी केल्याचे दिसून आले. आणि कोरोनाला कस हरवणार असा प्रश्न प्रशासनापुढे आता निर्माण झाला आहे. 

आवर्जून वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 


साडेतीन मुहूतापैकी एक मुर्हूत असलेला गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी प्रभुरामचंद रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले होते. यामुळे हिंदू बांधव घरापुढे गुढी उभारून तिची पुजा करतात. असा प्रघात श्रीरामाच्या काळापासून चालत आलेला आहे. गुढी पूजनासाठी लागणारे साखरेचे हार-कडे (हारकंगण) खरेदीसाठी सोबत डेअरीमधून गोड पदार्थ पेढे, बासूंदी, गुलाबजाम, श्रीखंड खरेदीसाठीही बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. पंधरा एप्रिलनंतर कडक लॉकडाऊन लागेल या भितीनेही नागरिकांनी किराणा व इतर सामानाच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. सर्वच व्यापारी संकूलातील दुकाने बंद होती. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, डेअरी, मिठाईची दुकाने सुरू होती.

कडक निर्बंधाचे काय ?
सर्वच ठिकाणी गदी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या कडक निर्बंधाचे काय ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला होता. तर व्यापारी संकूलातील व इतर आवश्‍यक नसलेल्या दुकानदारांनीच निर्बंध पाळायचे का ? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला होता. 

वाचा- पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !


सराफी, वाहनांची दुकाने बंदच 
गुढी पाडव्याला सोने खरेदी परंपरा आहे. त्याचबरोबर नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीही केली जाते. गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सराफ व्यावसायीकांसह नवीन वाहनांची दुकाने, इलेक्टॉनीक वस्तूंची दुकाने बंद होती. यंदाही ती बंदच असल्याने नागरिकांना खरेदीचा आनंद घेता आला नाही. तर या व्यावसायीकांचा या दिवसाचा व्यापार बुडाला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे