
गेल्या २४ तासांत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात चाळीसगाव, भुसावळ व रावेर तालुक्यातील तिघांचा समावेश असून तिघे ६० वर्षावरील आहेत.
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असली तरी गेल्या २४ तासांत तिघा रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीचा दर कमी होत असताना मृत्यूदर मात्र कायम आहे. दरम्यान, गेल्या दिवसभरात २३ नवे बाधित आढळून आले, तर २९ रुग्ण बरे झाले.
आवश्य वाचा- पोलिसांचा संशय ठरला खरा; 'त्या' तरुणाचा अनैतिक संबंधातून खून
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे. गेल्या २४ तासांत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात चाळीसगाव, भुसावळ व रावेर तालुक्यातील तिघांचा समावेश असून तिघे ६० वर्षावरील आहेत. आजच्या नव्या २३ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ६७७ झाली आहे. तर २९ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५३ हजार ९४८ झाला आहे.
आठ तालुक्यांत निरंक
जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या आठ तालुक्यात आज एकाही रुग्णाची नोंद नाही. तर जळगाव शहरात ५, जळगाव ग्रामीण व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी ६, चोपडा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
संपादन- भूषण श्रीखंडे