esakal | लाइनमने लढवली शक्कल..कोविडची लस घ्या; वीजबिलात सूट मिळवा 

बोलून बातमी शोधा

लाइनमने लढवली शक्कल..कोविडची लस घ्या; वीजबिलात सूट मिळवा 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे.

लाइनमने लढवली शक्कल..कोविडची लस घ्या; वीजबिलात सूट मिळवा 
sakal_logo
By
सचिन महाजन

जामठी (ता. बोदवड) : कोरोनाच्या संक्रमणाने संपूर्ण जगभरा हाहाकार माजलेला असताना त्याला थांबविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे लसीकरण सुरू असून, जनतेच्या मनात लसीबद्दल एक ना अनेक शंका उपस्थित होत आहेत. यावर मात करण्यासाठी जामठीचे लाइनमन राहुल निकम हे वीजग्राहकाने लस घेतली असल्यास त्याला वीजबिलात दहा रुपयांची सूट स्वखर्चाने देत आहेत. 

आवश्य वाचा- कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​
 


सरकार लसीकरणासाठी अनेक प्रकारच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पण, हवा तेवढा प्रतिसाद नागरिकांकडून दिसून येत नाही. मात्र, लसीकरणाबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी येथील वीज वितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात कार्यरत असलेले लाइनमन राहुल निकम यांनी जामठी गावासाठी कोविड लसीकरण जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढविली आहे.

बिलात सुट स्वःखर्चाने

समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ज्या वीजग्राहकाने लस घेतली असल्यास त्याला वीजबिलात दहा रुपयांची सूट ते स्वखर्चाने देत आहेत. याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कोविड लसीकरणाची आकडेवारीही वाढली असून, वीजबिलाचा भरणाही होत आहे. लाइनमन श्री. निकम यांनी कोविड लसीकरणासाठी केलेल्या जनजागृतीबाबत त्यांचे सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे