esakal | जळगाव जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Recovery rate

जळगाव जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) संसर्ग आटोक्यात येत असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) देश व राज्यापेक्षाही अधिक असून, आतापर्यंत ९८ टक्के रुग्ण (Patient) बरे होऊन घरी गेले आहेत. रविवारी (ता. ११) नवे सात बाधित आढळून आले, तर २३ रुग्ण बरे झाले. (corona recovery rate of jalgaon district at ninety eight percent)

हेही वाचा: पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी गेली वाया

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दोन महिन्यांपासून सातत्याने समोर येत आहेत. लॉकडाउननंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, त्यातही महिनाभरापासून सातत्याने नव्या रुग्णांची संख्या कमी व बरे होणारे अधिक, असे चित्र कायम आहे. रविवारी प्राप्त दोन हजार ७७१ चाचण्यांच्या अहवालात अवघे सात रुग्ण बाधित आढळून आले.

हेही वाचा: दौरा एक..नेते, गटबाजी अन्‌ प्रश्‍नही अनेक!

रविवारी मृत्यूची नोेंद नाही

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४२ हजार ४५४ झाली आहे, तर दिवसभरात २३ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ६१६ वर पोचला आहे. रविवारीही मृत्यूची नोंद झाली नाही. रविवारी जळगाव शहरात दोन, भुसावळ- दोन, रावेर- दोन, चाळीसगाव- एक, असे रुग्ण आढळून आले. अन्य १२ तालुक्यांत एकही रुग्णाची नोंद नाही. सक्रिय रुग्णांची संख्या घटून तीनशेच्या खाली म्हणजे २६४ पर्यंत मर्यादित राहिली आहे.

loading image