esakal | तब्बल.. सात दिवसांनी जळगावला झाला लसींचा पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल.. सात दिवसांनी जळगावला झाला लसींचा पुरवठा

तब्बल.. सात दिवसांनी जळगावला झाला लसींचा पुरवठा

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः जिल्ह्यात अखेर तब्बल सात दिवसांनी कोरोना लसींचा पुरवठा झाला आहे. आज सकाळीच ४० हजार २०० लसी उपलब्ध झाल्याने शहरातील बहुतांश सर्वच लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातही उद्यापर्यंत (ता.१४) लस पोचणार असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण उद्यापासून सूरू होणार आहे.

गेल्या बुधवारपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद आहेत. जी सुरू होती ती को-वॅक्सीन लसीची होती.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिलपासून ते १४ एप्रिलपर्यंत टीका महोत्सवाची (लसीकरण) घोषणा केली आहे. जळगाव जिल्ह्यात लस उपलब्ध नसलयाने टीका महोत्सवाचा फज्जाच उडाला होता.

लसीकरण केंद्र होती बंद

शहरात गेल्या बुधवारीपासून सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. या मुळे नागरिकांना लसींसाठी भटकंती करावी लागली. मात्र लस उपलब्ध झाल्या नसल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात लसच नसेल, तर आरेाग्य विभाग टीका महोत्सव कसा साजरा करणार असा प्रश्‍न आरेाग्य विभागाला निर्माण झाला होता. लसींचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य विभागही हतबल झाला होता.

सात दिवसांनातर मिळाल्या लसी

अखेर आज ४० हजार २०० जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचे डोस आलेले आहेत. यामुळे शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी लसीकरण सुरू झालेले आहे. जिल्ह्यासाठी आणखी एक लाख लसी मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

loading image