भाजप नगरसेवकाचा प्रताप; हात जोडून दखल न घेतल्याने अधिकाऱ्याला खड्यात ढकलत मारली कानाशिलात

चेतन चौधरी 
Friday, 25 December 2020

खड्डा बुजवावा अशी विनंती सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवकांनी ३ दिवसापूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती.

भुसावळ : अमृत योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत दीनदयाल नगर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून खड्डे खोदण्यात आले असून अद्यापही नळांची जोडणी केली नसल्यामुळे हे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. याबाबत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी अधिकाऱ्याला या खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावून चोप दिल्याची आज घटना घडली.

आवश्य वाचा- अट्टल गुन्हेगारांनी तरुणांना हेरले; गँग तयार करून गंभीर गुन्हे घडविण्याचा होता प्लॅन -
 

 शहरातील प्रभाग क्र. 20 मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध गड्डा करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील दोन तीन नागरिक या गाड्यांमध्ये पडले होते. त्यामुळे हे काम तातडीने करून खड्डा बुजवावा अशी विनंती येथील स्थानिक सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी ३ दिवसापूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती. मात्र अधिकाऱ्यांना हात जोडून देखील दखल न घेतल्याने नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना या खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावून चोप दिल्याने खळबळ उडाली आहे.

 
रस्त्याच्या मधोमध खड्डा
भुसावळ येथे अमृत योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये याच कामासाठी गेल्या आठ दिवसापासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आला होता मात्र रस्त्याच्या मधोमध गड्डा असल्यामुळे रात्रीच्या सुमारास ती ते चार जण या खड्ड्यात पडले होते.

वाचा- कापूस खरेदी केंद्राची अखेर आशा मावळली ! -

 

तीन दिवसापूर्वी हात जोडून विनंती

गेल्या तीन दिवसापूर्वी प्रभाग क्र. 20 चे भाजप नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत तातडीने काम करून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती. 

अखेर संयम सुटला 

विनंती करून ही अधिकाऱ्यांने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज अमृत योजनेच्या या अधिकाऱ्याला खड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी केला. तसेच अधिकाऱ्याला चोप दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporator marathi news bhusawal officer beaten rod pit