Fire Accident Crop Damage : शॉर्टसर्किटमुळे कापूस जळून खाक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Crop Fire reference image

Fire Accident Crop Damage : शॉर्टसर्किटमुळे कापूस जळून खाक!

जळगाव : फुफनगरी (ता. जळगाव) येथील शेतकऱ्याने अंगणात सुकविण्यासाठी टाकलेल्या कापसाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे १८ क्विंटल कापूस खाक झाला. (Cotton crop burn due to short circuit at nandgaon Jalgaon Latest Jalgaon News) तालुका

हेही वाचा: Nashik : सूर्यग्रहणाचा मनमाडकरांनी अनुभवला अविष्कार; सन गॉगल्स, X- ray पेपरचा वापर

पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. जळगाव तालुक्यातील फुफनगरी येथील शेतकरी रवींद्र माणिक चौधरी (वय ५०) यांच्या शेतामध्ये कापसाची लागवड झालेल्या कापसाची काढणी करून तो साठविण्यासाठी घरी आणला होता.

कापसाला ऊन दाखवून तो कोरडा करण्यासाठी रविवारी (ता. २३) कापूस अंगणात ठेवला होता. दुपारी साडेचारला अचानक महावितरण कंपनीच्या वीजखांबावरून शॉर्टसर्किटमुळे ठिणग्‍या पडून कापसाला आग लागली. यात १८ क्विंटल कापूस खाक झाला. अनिल फेगडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik : वाहतूक कोंडीत गुदमरतोय नांदगावकरांचा श्वास!