पोलिसांचा संशय ठरला खरा;  'त्या' तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

चेतन चौधरी 
Monday, 28 December 2020

मयताच्या मानेवर व अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे पोलिसांनी ही घटना अकस्मात मृत्यूची नसल्याचे व खून झाल्याचे खात्री पटली.

भुसावळ  :  नशिराबाद रेल्वे लाईन परिसरात आढळलेला मृतदेहा संदर्भात त्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाला असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या खून प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली आहे.  याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला मयत त्याचे वडील भगवान रघुनाथ सपकाळे  यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवश्य वाचा- पिल्लू विहिरीत पडल्याने मादी बिबट्याने फोडला मातृत्वाचा हंबरडा..आणि सुरू झाले रेस्क्यू ! 

रावेर तालुक्यातील सुनोदा येथील दीपक भगवान सपकाळे  ( 24 ) असे मयताचे नाव आहे . सपकाळे याचे गावातीलच एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. शनिवारी  त्याला  यावल तालुक्यातील पाडळसे येथे महिलेच्या माहेरी बोलावण्यात आले होते .रात्री 10:30 ते 12:30 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह नशिराबाद  हद्दीतील रेल्वे  परिसरात टाकण्यात आल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांचा संशय ठरला खरा

 रविवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली . सपकाळे यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचा देखावा  आरोपीकडून करण्यात आला . डी . वाय.  एस. पी . सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण , नशिराबाद व  बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली . पोलिसांना यासंदर्भात हा घातपात असावा असा संशय आला. मात्र तरीही नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रथम आकस्मात मृत्यू 38 /"20 सीआरपीसी  174 प्रमाणे  नोंद करण्यात आली . मयताच्या मानेवर व अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे पोलिसांनी ही घटना अकस्मात मृत्यूची नसल्याचे व खून झाल्याचे खात्री पटली. मात्र त्या अनोळखी ची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे मयताची ओळखही अवघ्या तीन ते चार तासात पटवण्यात पोलिसांना यश आले  . या तरुणाची एका विवाहितेशी अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आवर्जून वाचा- ..तर खडसेंच्या निर्देशानुसार निर्णय 
 

तीन संशयीत आरोपींना अटक

पोलिसांनी एका महिलेसह नितीन राजू धाडे ( 24 ,रा. सुनोदा ) व हेमंत बाळू कोळी ( 21 रा .पाडळसे ) यांना अटक केली आहे. घटना यावल तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असली तरी , डीवायएसपी वाघचौरे यांच्या सह नशिराबाद व भुसावळ पोलिसांच्या परिश्रमाने गुन्हा उघडकीस आणण्यात मोठे यश मिळाले. अवघ्या तीन ते चार तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली आहे . पोलिसांचे मेहनत पाहता हा गुन्हा नशिराबाद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीवायएसपी वाघचौरे यांनी दिली.

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news bhusawal police arrested criminal