पोलिसांनी राबविले भंगार बाजारात कोंबिंग ऑपरेशन; तब्बल ! २५ दुचाकी, चारचाकी वाहने जप्त

पोलिसांनी राबविले भंगार बाजारात कोंबिंग ऑपरेशन; तब्बल ! २५ दुचाकी, चारचाकी वाहने जप्त
Updated on

भुसावळ : शहरात वाहनांच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली असतानाच चोरट्यांचा सुगावाही लागत नसल्यामुळे आज (ता. ९) पोलिसांनी १३भंगार दुकाने आणि गोदामांची झाडाझडती घेतली. यावेळी वाहनांच्या सुट्या भागांची तपासणी करण्यात आली. अनेक गाड्यांचे इंजिन, चेसीस नंबर पोलिसांनी तपासून पाहिले. या झडतीदरम्यान संशयास्पद २० दुचाकीसह ३ चारचाकी आणि २ ऑटोरिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

शहरासह जिल्ह्यात दुचाकींसह माेठ्या वाहनांच्या चाेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येत नसल्याचे उपविभागीय पाेलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भंगार बाजारात काेम्बिंग अाॅपरेशन राबविण्याचे अादेश दिले. त्यांच्या नेतृत्वात हे अाॅपरेशन राबविण्यात अाले. सकाळीपासूनच पोलिसांचा फौजफाटा भंगार बाजार भागात पोहाेचला. भंगार बाजार अाणि गोदामात एकाच वेळी काेम्बिंग अाॅपरेशन सुरू केले. या वेळी अचानक अालेल्या पाेलिसांच्या फाैजफाट्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली. एकाच वेळी सर्व दुकानांची तपासणी सुरू झाली. भंगार बाजारात एकाच वेळी काेम्बिंग अाॅपरेशन राबवले. या कारवाईत बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकासह शहर पोलीस ठाणे, आणि तालुका पाेलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच अारसीपी प्लाटून यांची मदत घेतली. 
 

दुकान मालकांकडून मागवले स्पष्टीकरण 
पाेलिसांनी भंगार बाजारातून २० दुचाकी, ३ चारचाकी, २ ऑटोरिक्षा अशी एकूण २५ वाहने ताब्यात घेतली अाहेत. त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर याेग्य असतील ती वाहने साेडण्यात येतील, असे सांगितले. पाेलिसांच्या पथकांनी खडका रोड परिसरातील भंगाराची सर्व दुकाने तपासली. भंगाराच्या गाेदामांमध्ये ठेवलेले इंजिन्स, चेसीस तसेच इतर साहित्य तपासून त्यांचे क्रमांकही बघितले. ज्या इंजिन चेसीसचे क्रमांक नव्हते त्यांचे स्पष्टीकरण पाेलिसांनी मागितले आहे. जर दुकानमालकाला ते स्पष्टीकरण देता आले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे ही पोलिसांनी सांगितले. 

एकाच वेळी सर्च मोहीम

भुसावळ शहरात व परिसरात मोटरसायकल, कृषी पंपासह इतर किरकोळ चोरीच्या वस्तुंची विल्हेवाट लावणारे किंवा चोरीच्या वस्तुंची खरेदी करणारे यांना चोरीच्या वस्तु घेण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भंगारचे दुकान आणि गोडावुनवर एकाचवेळी सर्च मोहीम राबविण्यात आली. 
 

लाखोंचे साहित्य जप्त
 सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, बाजारपेठ पोलीस ठाणेचे पो.नि.दिलीप भागवत, भुसावळ शहर पोलीस ठाणेचे पो.नि.बाबासाहेब ठोंबे , तालुका पोलीस ठाण्याचे पोनि रामकृष्ण कुंभार, स.पो.नि.गणेश धुमाळ,अनिल मोरे यांनी दहा पोलीस पथकाडुन तपासणी केली. त्यात चारचाकी बंद स्थितीतील वाहने - ३, तीन चाकी वाहने- २ (रिक्षा), दुचाकी वाहने- २०, दुचाकी वाहनाचे इंजिन - २, इलेक्ट्रीक मोटर बॉडी - ४५, मोटरसायकल स्पेअर पार्ट- १६, व्हील डिस्क - ४, पाईप - ८,  अँगल - २, लोखंडी नवे तार बंडल- २, जनरेटर- ३,  कॉम्प्युटर १ असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा- गट-तट विसरा आणि कामाला लागा; यश निश्चीत मिळेल !


न्यायालयात अहवाल सादर करणार
वरील सर्व वस्तु या संशयास्पद असल्याने या वस्तुंबाबत स्वतंत्रपणे पंचनामे करण्यात आले आहेत. याचा न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार असुन, न्यायालयाचे पुढील आदेशाप्रमाणे संबधीत व्यक्तींवर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार
आहे.

वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ही झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान संशयास्पद वाहने ताब्यात घेतली आहेत. ज्या वाहनांची कागदपत्रे चोख असतील ती दुकानदारांना परत केली जातील. मात्र, ज्या वाहनांची कागदपत्रे संशयास्पद असतील अथवा ती सापडलीच नाही तर संबंधित दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्यात येईल. 
-सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पाेलिस अधिकारी.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com