
प्रेम जुळल्यानंतर दोघे नोव्हेंबर महिन्यात पळून गेले आणि प्रेमविवाह करून पोलिस स्टेशनला येवून विवाह केल्याचे सांगितले.
जळगाव ः धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील तरुण-तरुणी महिनाभरापूर्वी बेपत्ता झाले. दोघांनी प्रेम विवाह करुन घरी परतले परंतू तिन-चार दिवसातचं तरुणीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची खळबजणक घटना आज घडली. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. मृत विवाहीत तरुणीचा मृतदेह संशास्पद असल्याने सासरच्या मंडळीनी तिचा घातपात केला असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईंकांनी केला.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: जिल्हयात १९ हजार ९८३ अर्ज वैध
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील आरती विजय भोसले (वय १९) ही तरुणी घरातून बेपत्ता होती. दत्त जयंतीच्या दिवशी गावातील प्रशांत पाटील याच्यासोबत प्रेम विवाह करून परत आली होती. तीन-चार दिवस होत नाही तोच आज सकाळी मृत आरतीचा मृत्यू झाला असल्याची खबर आईला लागली.
महिनाभरापासून दोघे बेपत्ता
मृत आरती व विजय पाटील यांचे दोघाचे प्रेम जुळल्यानंतर दोघे नोव्हेंबर महिन्यात पळून गेले होते. त्यानंतर प्रेमविवाह केल्यानंतर पाळधी पोलिस स्टेशनला स्वःता येवून पोलिसांना लग्न केल्याची माहिती दिली.
आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात लवकरच 'कोरोना’ची लस; प्रथम या कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस !
संशयास्पद मृत्यू
मृत आरतीच्या आईला गावातील काही तरुणांनी जावून आरतीचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. आरतीच्या सासरी तिची आई गेली असता आईला आरतीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. सासरच्या मंडळीने घातपात करून तिची हत्या केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयात गोंधळ
आरती विजय भोसले हिचा मृतदेह पोलिसांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. शवविच्छेदन झाल्यानंतर आरतीच्या नातेवाईकांनी घेण्यास नकार देत जोवर आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह स्विकार नाही अशी पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
आवर्जून वाचा- नो गुटखा,नो बियर ! फक्त `हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर’
दोघांच्या आई-वडीलांचे हमाली काम
पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळील एका गोडावून मध्ये तरुण-तरुणीचे आई-वडील कामाला होते. तर गोडावून जवळ दोघे कुटूंब राहायला होते.