esakal | काळी हळद देण्याच्या बहाण्याने बोलावले; आणि दोघांना लाखात लुबाडले 
sakal

बोलून बातमी शोधा

काळी हळद देण्याच्या बहाण्याने बोलावले; आणि दोघांना लाखात लुबाडले 

बाहेरील राज्यातील लोक काळी हळद अथवा नागमणी या अशा वस्तूच्या अमिषा पोटी कर्नाटक ओरिसा केरळ अशा बाहेर राज्यातून येत असतात.

काळी हळद देण्याच्या बहाण्याने बोलावले; आणि दोघांना लाखात लुबाडले 

sakal_logo
By
दिपक चौधरी

मुक्ताईनगर : गुजरात मधील दोघांना काळी हळद देण्याचा बहाणा करून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बोलावले. आणि दोघांना लाखात लुबाडल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात या घटनेची आज फिर्यादीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली. 

आवश्य वाचा- ‘कृउबा’तील हमाली दरवाढीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य  ​
.

गुजरात राज्यातील वापी जिल्ह्यातील वालोळ येथील शाकीर अहमद हासिम आमली वाला यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे काळी हळद मिळत असल्याचे मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील शुभम संजय पाटील व हलखेडा येथील सुमारे दहा ते बारा अनोळखी आदिवासी इसमांनी शाकीर अहमद हासिम आमली वाला यांना सांगितले. आणि काळी हळद घेण्यासाठी हल खेडा येथे बोलावले. शनिवारी शाकीर अहमद हाशिम व त्यांच्या सोबत एक व्यक्ती असे दोघे गुजरातवरून कुऱ्हा येथे आले. शुभम संजय पाटील तसेच त्यांच्या सोबत असलेले हलखेडा येथील दहा ते बारा आदिवासी अनोळखी इसमांनी शाकीर अहमद हासिम यांच्या मोबाईल वरून 86 हजार तीनशे रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्यांच्या जवळचे घेतले दोन मोबाईल हिसकावून घेतले मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती परविन तडवी या करीत आहेत दरम्यान या घटनेत एकासही अटक करण्यात आलेली नाही.

संशयीत कुऱ्हा येथील असण्याची शक्यता

दरम्यान दरम्यान या घटनेतील संशयित आरोपीत कुर्‍हा येथील एक तर हलखेडा येथील दहा ते बारा जणांचा संशय आहे . याबाबत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान यात अद्याप एकालाही अटक करण्यात आली नसल्याचे समजते.

आवर्जून वाचा- चोपडा तालुक्यात ११७ एकरमध्ये होणार‘एमआयडीसी’ प्रकल्प

नागमणी, काळी हळदीचे अमिष

मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले कुऱ्हा परिसर यामध्ये असे बरेच घटना घडत असून बाहेरील राज्यातील लोक काळी हळद अथवा नागमणी या अशा वस्तूच्या अमिषा पोटी कर्नाटक ओरिसा केरळ अशा बाहेर राज्यातून येत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते व त्यांच्या जवळील पैसे सोने नाणे असे जेवर लूटमार करून त्यांना मारण्यात येते असल्याचा घटना घडतात.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image