
काही अंतर गेल्यावर डिकीचे कुलूप लावून घेऊ म्हणून ते थांबले असता डिकीतून रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. या वेळी त्यांनी बँक परिसरात शोध घेतला.
पारोळा : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परिसरातून भरदिवसा मोटारसायकलच्या डिकीतून दोन ज्येष्ठ नागरिकांचे एक लाख ४० हजार रुपये भामट्यांनी लंपास केले. ही घटना घडली.
आवश्य वाचा- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिरुड गावाची अनोखी शक्कल; जाणून घ्यायचयं, मग वाचा सविस्तर !
वीज विभागाचे निवृत्त कर्मचारी हिलाल हरी पाटील यांना मित्रास उसनवारीची रक्कम एक लाख परत मिळाल्याने ती आपल्या एसबीआयच्या खात्यात भरू म्हणून त्यांनी मोटारसायकल (एमएच १९, डब्ल्यू १८५) च्या डिकीत रुमालात ठेवून सव्वाबाराच्या सुमारास शाखेत आले. मात्र, प्रचंड गर्दी असल्याने रक्कम पुन्हा डिकीत ठेवून ते परतीच्या मार्गावर निघाले.
डिकीचे कुलूप लावण्यासाठी उतरले
काही अंतर गेल्यावर डिकीचे कुलूप लावून घेऊ म्हणून ते थांबले असता डिकीतून रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. या वेळी त्यांनी बँक परिसरात शोध घेतला; परंतु आरोपी व रक्कम मिळून आली नाही, तर दुसऱ्या घटनेत याच दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील एकजण ४० हजार रुपये भरणा करण्यासाठी बँकेत आला. मात्र, गर्दीमुळे भरणा नंतर करू, असे ठरवून त्यांनी ४० हजारांची रक्कम पिशवीत ठेवली. ती पिशवी मोटारसायकलच्या डिकीत ठेवून ते परतीच्या मार्गावर निघाले. त्यानंतर बाजारात गेले असता काही घरगुती साहित्य डिकीत ठेवण्यासाठी डिकी बघितली. मात्र, डिकीतून रक्कम असलेली पिशवी लंपास झाली होती. याबाबत त्यांनी तपास केला, पण आरोपी मिळून आला नाही.
आवश्य वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !
सीसीटीव्ही फुटेज मिळाले, पण...
एकाच दिवशी दोन घटना झाल्याने पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, कर्मचारी किशोर भोई यांनी दुपारी बारा ते चार असा सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला, परंतु आरोपींनी चलाखी करत हातसफाई केल्याचे दिसून आले. या फुटेजमध्ये काही संशयित लहान मुले दिसून येत असून, याबाबत तपास सुरू आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे