थराररक घटना : धावत्या ट्रकवर चढले आणि चालकावर केला चाकु हल्ला 

crime
crime

रावेर : जिल्ह्यात घरफोडी, दरोडे तसेच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळ जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता चोर व दरोडेखोरांनी महामार्ग व मार्गावरील वाहनांनावर मोर्चा वळविलेला दिसून येत आहे. रावेर येथे मंगळवारी रात्री धावत्या ट्रकवर चढून चोरांनी चालकावर हल्ला करीत लुटमार केल्याची थरारक घटना घडली.
 

मध्यप्रदेशातील चिरीया (ता. झिरन्या) येथील दिनेश जैस्वाल यांचा तुरडाळीने भरलेला ट्रक (एमपी ६९, एच ९९०५) हा पाल कुसुंबा मार्गे रावेरहून बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास येथील बिंबे पेट्रोल पंपाजवळून जात होता. यावेळी चालत्या ट्रकच्या कॅबीनमध्ये दोन जणांनी चढून चालक अमीन भुत्तो समसोद्दिन व क्लिनर फरीदखान (रा. चिरिया) यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम १० हजार ७०० रुपये असे एकूण १३ हजार २०० चा मुद्देमाल दोघांवर चाकूने वार करून जखमी करून चोरून नेले. याबाबत अमीन भुत्तो याने रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

ट्रक चालकाची हिम्मत
धावत्या ट्रकवर चढून चालकावर हल्ला करून दोघांना लुटले. हाताला चाकु लागलेला असतांना देखील ट्रक चालक यांनी ट्रक न थांबविता थेट ट्रक सावदा गावार्पयंत आणला. पेट्रोल पंपावर आल्यावर पोलिसांना संपर्क केल्यावर पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती.

पोलिसांची तत्परता
सह्यायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक रात्री गस्तीवर असतांना तीन जण संशयीत फिरतांना आढळले होते. त्यांनी तिघांनाचे फोटे काढून घेतले होते. ट्रक लुट प्रकरणातील जखमी चालकांला हे फोटो दाखविल्यावर संशयीत हेच असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच तपास करून गौरव विजय बिरपन, भूषण धनराज विचवे (दोघे रा. भाटखेडा) व मनीष सुरेश पवार (रा. रावेर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com