Crime News : दूध संघ गैरव्यवहार प्रकरण; FDAला कस्टडीतूनच मिळवावे लागणार नमुने

Milk
MilkSakal

जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघातील अखाद्य (बी ग्रेडच्या) तूप विक्री किंवा त्यापासून बाय-प्रॉडक्ट तयार करण्याचे अधिकार दूध संघाला नाहीत, तरीही दूध संघातील ‘मस्तवालांनी’ चॉकलेट फॅक्टरीला अखाद्य (मानवी आरोग्यास अपायकारक) विकल्याचे आढळल्यानंतर जागे झालेल्या स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने रेकार्ड तपासणीसाठी दूध संघात धडक दिली. मात्र, पोलिसांनी रेकॉर्ड सील केल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. जर राज्य शासनाची निष्पक्षपाती कारवाईची मानसिकता असेल, तर केंद्रीय एफडीए अन् एफडीए यांच्यात समन्वय घडवून या गुन्ह्याला निर्णयापर्यंत नेत दोषींना शिक्षा होऊ शकते.

Milk
Twitter Bird : ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं काय आहे खरं नाव, जाणून घ्या कहाणी

जिल्हा दूध संघातील एक हजार ८०० किलो अखाद्य (बी ग्रेड) तूप चॉकलेट कंपनीस विकून गैरव्यवहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पोलिस तपासात संशयित रवी अग्रवाल कैलादेवी कुटिरोद्योग नावाने ‘राजेमलाई’ चॉकलेटचा उत्पादक वितरक आहे. संशयित मनोज लिमये, हरी पाटील आणि रवी अग्रवाल यांनी विठ्ठल-रुक्मिणी एजन्सी स्थापन करून अखाद्य तुपाची विल्हेवाट लावली. हे तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे माहीत असूनही त्याचा वापर चॉकलेट बनविण्यासाठी केला. हा प्रकार वर्षेनुवर्षे सुरू होता. रवी अग्रवाल याच्या अकोला येथील कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाइन ट्रान्झेक्शन झालेली कागदपत्रे सापडली. ऑगस्टमध्ये जळगावच्या अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल यांनी तूप खरेदी केले. परंतु दूध संघातून एकाचेच वाहन बाहेर पडल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्याचा माल कोठून व कोणत्या वाहनातून गेला?, हे स्पष्ट होत नाही. पोलिसांनी या प्रकरणी संपूर्ण पाळेमुळे खोदायला सुरवात केली आहे.

Milk
आजारी बापाला तूप आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये 3 BSF जवानांचाही सहभाग

तपासात आढळली आणखी एक ‘एन्ट्री’

अकोल्यातून रवी अग्रवालच्या तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाइन ट्रान्झक्शन झालेली कागदपत्रे सापडली.परंतु त्याने काही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली. शनिवारी (ता. १८) पोलिसांना रवी अग्रवाल आणि त्याच्या वडिलांची एक ‘एन्ट्री’ सापडल्याची माहिती समोर आली आहे. मूळ फिर्यादीप्रमाणे एक हजार ८०० किलो तूप, प्रतिकिलो ८५ रुपये किमतीप्रमाणे भाव खरेदी केला जात होता. मात्र, त्याची विक्री १०० प्रमाणे केली जात होती. थोडक्यात, एका किलोमागे १५ रुपये नफा कमावला जात होता.

दोन पेमेंटच्या एन्ट्री... मात्र बाहेर पडले एकच वाहन

पोलिसांच्या माहितीनुसार, रवी अग्रवाल आणि अनिल अग्रवाल या दोघांनी ऑगस्टमध्ये साधारण एक हजार ६०० ते एक हजार ७०० किलोचा माल खरेदी करून पैसे दिले. परंतु संघातून केवळ एकच वाहनातून माल बाहेर पडल्याची नोंद आहे. त्यामुळे जळगावचा माल हा कोठून दिला गेला आणि कोणत्या वाहनाने गेला? दरम्यान, निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिरातून १५ किलोप्रमाणे सहा तुपाचे डबे अनिल अग्रवाल याने दिले आहेत. एक महिन्यात या मंदिराला साधारण ३३ डबे तूप पुरवले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Milk
शिवाजी महाराज, फुले दाम्पत्यांविषयी राज्यपाल कोश्यारींची संतापजनक वक्तव्ये; तरी...

‘विठ्ठल-रुखमाई’च्या तपासाकडे लक्ष

जळगाव एफडीएला शनिवारी (ता. १८) शहर पोलिसांनी तपासात सहकार्य करण्यासाठी मदत करावी, असे पत्र दिले आहे. तर दुसरीकडे जळगाव एफडीए पथक दूध संघात गेले होते. परंतु संपूर्ण रेकॉर्ड पोलिसांनी सील केल्याने त्यांना कुठलेही कागदपत्र मिळाली नाहीत. त्यांना परवाना दिला आहे. दरम्यान, पोलिसांची मदत मागितल्याने आता याबाबत सोमवारी (ता. २०) पुढील कारवाई होणार आहे. ‘एफडीए’लाच विठ्ठल-रुखमाई एजन्सीची कसून चौकशी करावी लागणार आहे. कारण स्थानिक ‘एफडीए’नेच त्यांना किरकोळ विक्रीचा परवाना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com