Latest Marathi News | Cyber Crime : बँकखाते बंद पडण्याची भीती दाखवत वृद्धाला लाखोंना गंडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber-Crime-Station

Cyber Crime : बँकखाते बंद पडण्याची भीती दाखवत वृद्धाला लाखोंना गंडवले

जळगाव : बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून जळगाव शहरातील कोल्हेनगर येथील सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल नऊ लाख १९ हजार ९९५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील कोल्हेनगर परिसरात सुभाष राजाराम पाटील (वय ६१) कुटुंबीयांस वास्तव्यास आहेत. ते सेवानिवृत्त शासकीय नोकरदार असून, मंगळवारी (ता. ६) अज्ञात व्यक्तीने सुभाष पाटील यांना खोटा व बनावट संदेश मोबाईलवर पाठविला. नंतर ८७६८२५१४६९ या मोबाईल नंबरवरून त्यांना फोन करत तुमचे बँकेचे खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून बँक खाते चालू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठवलेल्या संदेशात असलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यात आधारकार्ड व पॅनकार्डची माहिती भरण्यास सांगितली.

हेही वाचा: दवाखान्यात उपचाराच्या नावे कैद्यांची मद्य पार्टी; दारूच्या नशेत कारागृहात धिंगाणा

OTP आला अन् रक्कम घेवून गेला...

माहिती भरताच सुभाष पाटील यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो संबंधिताने विचारून सुभाष पाटील यांच्या बँक खात्यातून तब्बल नऊ लाख १९ हजार ९९५ रुपये ऑनलाइन परस्पर काढून घेतले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत ८७६८२५१४६९ आणि अन्य अज्ञात मोबाईलधारकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक : व्यावसायिकाचे अपहरण करून खून; मालेगाव जवळ सापडला मृतदेह

Web Title: Cyber Crime Swindled Old Man Fraud With 9 Lakh In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..