सातपुडा, तापी पट्ट्यात वादळाचा केळीला फटका

वादळी पावसाने झाडे मोठ्या प्रमाणावर कोसळली असून, केळी पिकाचे नुकसान झाले आहे
Agriculture damage
Agriculture damageesakal

रावेर (जि. जळगाव) : तालुक्यातील सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, खिरोदा (प्र. यावल) आणि तापी पट्ट्यात बुधवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने झाडे मोठ्या प्रमाणावर कोसळली असून, केळी पिकाचे नुकसान झाले आहे तर धामोडी, कांडवेल येथेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

सावखेडा बुद्रूक येथे सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या जोरदार हवेने ग्रामपंचायतीजवळ असलेला सुमारे १५० वर्षे जुना वटवृक्ष प्रल्हाद बाबूराव पाटील यांच्या घरावर कोसळला. त्यात त्यांचे ट्रॅक्टरही दबले गेले. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले आहे. परिसरातील युवकांनी ताबडतोब घरात जाऊन घरातील स्त्री-पुरुषांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सावखेडा परिसरात या जोरदार हवेमुळे विजेचे खांब वाकले असून, तारा तुटल्या आहेत. येथे सुरू असलेल्या जोरदार हवेमुळे सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, गौरखेडा, लोहारा, खिरोदा (प्र यावल), कुंभारखेडा गावातील केळीचे नुकसान झाले आहे. तसेच खिरोदा (प्र. यावल) येथील बेघर वस्तीतील अनेक घरांचे पत्रे उडाले असून, तेथेही केळीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तापी किनाऱ्यावरील धामोडी या गावात हलकी गारपीट झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Agriculture damage
हळदीच्या दिवशीच नवरदेवाला मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com