Jalgaon Crime News : मित्रांच्या पार्टीत गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह; तरवाडे येथील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body of young man who went to friends party was founded jalgaon news

Jalgaon Crime News : मित्रांच्या पार्टीत गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह; तरवाडे येथील घटना

तरवाडे (जि.जळगाव) : येथील तरुण १५ मार्चला मित्रांच्या पार्टीत जेवणाला गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. दरम्यान, चाळीसगाव येथील गणपती मंदिर परिसरातील विहिरीत बुधवारी (ता. २९) त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (dead body of young man who went to friends party was founded jalgaon news)

तरवाडे येथील समाधान बागूल (वय ३०) हा आपल्या दोन मित्रांसोबत चाळीसगाव येथील करगाव रोड गणपती मंदिराजवळील हॉटेल बंजारा येथे पार्टीसाठी गेला होता. त्या ठिकाणी काही वाद झाल्याची चर्चा सुरू होती.

त्या दिवसापासून समाधान कुठेही आढळून आला नसल्याने त्याच्या भावाने २० मार्चला हरविल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यान, आज (ता.२९) ज्या हॉटेलला पार्टीला गेले, त्या हॉटेल परिसरातच काही अंतरावर असलेल्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार शवविच्छेदन करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

घातपाताचा संशय

दरम्यान, समाधान याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांसह तरवाडे ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. ज्या वेळी मृतदेह आढळून आला, त्या विहिरीत पाणी भरपूर होते आणि समाधान याला उत्कृष्ट पोहता येत होते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याला बाहेरच मारून विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तपासात काय समोर येईल, याकडे संपूर्ण चाळीसगावकरांचे लक्ष लागून आहे.