Jalgaon News : बालसुधारगृहात गळफास घेतलेल्या बालिकेचा मृत्यू; समितीने म्हणणे मांडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

Death News
Death Newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हा निरीक्षणगृह तथा बालसुधारगृहात असलेल्या १४ वर्षीय बालिकेने शौचालयात गळफास घेतल्याची घटना शनिवारी (ता. १२) सकाळी अकरापूर्वी घडली होती. मैत्रिणीच्या ही बाब लक्षात आल्याने तातडीने तिने मैत्रिणीस मदत करून जीव वाचविला होता.

तशाच अवस्थेत या मुलीला जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. गेले ११ दिवस या मुलीवर उपचार सुरू असताना तिचा आज मृत्यू झाला.

एरंडोल येथील आश्रमशाळेतील बालिका अत्याचाराचा घटनेत गुन्हा दाखल होऊन चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या बालकल्याण समितीतर्फे चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या निरीक्षणगृहानेच निष्काळजीचा कळस गाठला आहे. (Death of girl who attempted suicide juvenile detention center jalgaon news)

निरीक्षणगृहात दाखल मुलीने शौचालयात जाऊन गळफास घेतल्याची घटना घडली. समितीतर्फे बोलण्यास अद्याप कोणीच समोर आलेले नसून, भेट देण्यासही निरीक्षणगृहाच्या कार्यालयाने नकार दिला आहे.

निरीक्षणगृहात दाखल अल्पवयीन मुले-मुली आणि विधीसंघर्षित बालकांच्या काळजीची संपूर्ण जबाबदारी असलेल्या निरीक्षणगृहात गळफास घेतल्याचा गंभीर प्रकार घडला असून, संबंधितांच्या हलगर्जीतून घटना घडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रेम प्रकरणाचा कळस

अमळनेर येथील १४ वर्षीय बालिकेचे तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्याने ते दोघेही घर-गाव सोडून निघून गेले. अमळनेर पोलिसांत बालिका अपहरण गुन्ह्याची नोंद होऊन पोलिसांनी पीडित मुलीसह संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

संशयिताची कारागृहात रवानगी झाल्यावर या मुलीला पालकांकडे सोपवत असताना याच वेळी मुलीने आई-वडिलांबरोबर जाण्यास नकार दिल्याने तिची गुरुवारी (ता. ३) बालसुधारगृह जळगाव येथे रवानगी करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Crime News : चुलत भावाने केला चुलत भावाचाच कोयत्याने वार करुन खून... !

तेव्हापासून ती येथे राहत होती. मुलीने सोडून देण्यासाठी वाद घातला म्हणून तिच्या पालकांना बालसुधार समितीमार्फत फोन करून संपर्क करण्यात आला.

मात्र, आई-वडील दोघेही मोल-मजुरीसाठी गुजरातमध्ये असून, त्यांनी मजुरीचे पैसे मिळाल्यावर तीन-चार दिवसांनी येतो, असे सांगितले. समितीसमक्ष शुक्रवारी (ता. ११) या मुलीची चौकशी होऊन तिची समजूत काढण्यात आली.

मात्र, ती निर्णयावर ठाम असल्याने पीडितेने दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. १२) सकाळी साडेदहादरम्यान गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारार्थ जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माहिती देण्यास नकार

घडल्या प्रकाराबाबत बालनिरीक्षणगृहाशी संपर्क साधला असता तिन्ही वेळेस संबंधितांच्या भेटीनंतर माहिती देण्यास नकार देण्यात आला. निरीक्षणगृहाच्या ०२५७-२२२४२०७ या अधिकृत फोनवर संपर्क साधला असता संबंधितांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. तदनंतर समितीप्रमुख जयश्री पाटील यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी घेतला नाही.

Death News
Jalgaon Crime : सहाय्यक फौजदाराला कवेत धरत वाळू ट्रॅक्टर पळविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com