Jalgaon Crime News : कर्जबाजारी शेतकऱ्याची पातोंडा येथे आत्महत्या

Farmer Sucide Case
Farmer Sucide Caseesakal

पातोंडा (ता. अमळनेर) : येथील शेतकरी राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५०) यांनी गुरुवारी (ता. ८) आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. त्यानंतर राजेंद्र पाटील यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र पाटील गुरुवारी शेतात तुरीवर फवारणी करण्यासाठी गेले होते.

सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दोन एकर व भाडेतत्वावर चार एकर जमीन होती. (Debt farmer commits suicide in Patonda Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Farmer Sucide Case
Jalgaon News : रेल्वेला 77 टक्के महसूल Online Bookingमधून

शेतीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून ३५ ते ४० हजार पीककर्ज, बचत गटाचे ७५ हजार रुपये व मजुरीसाठी ५० ते ६० रुपयांची हात उचल, असे एकूण दीड लाखापर्यंत कर्ज त्यांच्यावर होते.

बेमोसमी पाऊस, उशिरा झालेली दुबार पेरणी व त्यामुळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता, कर्जाचा डोंगर चढत असल्याच्या विचारत त्यांनी हे पाऊल उचल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत होती. राजेंद्र पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व मुलगी असा परिवार आहे.

Farmer Sucide Case
Jalgaon News : सोन्याने गाठला 55 हजारांचा टप्पा; चांदीला 1500 ची झळाळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com