Jalgaon News : मनपातील 14 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आस्थापनावर समावून घेण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : मनपातील 14 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आस्थापनावर समावून घेण्याचा निर्णय

जळगाव : शहर महापालिकेच्या ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या (Municipal Corporation) आस्थापनेवर सामावून घेण्याबाबत शासनाने मान्यता मिळाली आहे. (Decision to accommodate 14 daily employees of municipality in establishment jalgaon news)

१४ कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता असल्याने त्यांना तातडीने सामावून घेतले आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शासन स्तरावर प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे ज्या पदावर सामावेश होणार आहे, त्या पदाची किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असेल, अशी अट आहे. यासंदर्भात शासन स्तरावर अनेक दिवसांपासून निर्णय प्रलंबित होता. शुक्रवारी (ता. २४) रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

१२ रोजंदारी कर्मचारी कार्यरत असलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता धारण करीत नसल्याने, त्यांची शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्यास मान्यताही दिली आहे. यासंदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

मागील आठवड्यातच महापालिकेच्या नवीन आकृतिबंधास मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकार्य केल्याने आमदार भोळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.