Latest Marathi News | Instagramवर बनावट Account तयार करुन तरुणीची बदनामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman defamation through fake insta account

Cyber Crime : Instagramवर बनावट Account तयार करुन तरुणीची बदनामी

जळगाव : इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून प्राध्यापक तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तींना अश्लील छायाचित्र पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (ता. २५) सायंकाळी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने शनिवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी पाचला अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत. (Defamation of young woman by creating fake account on INSTAGRAM Nashik)

हेही वाचा: NCP on Tanaji Sawant : '... तर रस्त्यावर फिरणं मुश्किल करू' राष्ट्रवादीकडून सावंतांना इशारा

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील २४ वर्षीय प्राध्यापिका तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. १० ते २४ सप्टेंबरदरम्यान) अज्ञात व्यक्तीने या प्राध्यापक तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तिच्या ओळखीच्या लोकांना व मित्रांना रिक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी यासाठी बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरुषांचे अश्लील छायाचित्र ठेवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला

हेही वाचा: Rohit Sharma : स्लॉग ओव्हरची चिंता नाही! बुमराह अन् हर्षलबद्दल कर्णधार रोहित म्हणाला...