वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

जळगाव : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : वंचित बहुजन आघाडीने पाचोरा येथे आयोजित मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. वंचित बहुजन आघाडीचा मेळावा पालिकेच्या राजीव गांधी टाऊन हॉलमधील सभागृहात झाला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा कार्यालय सचिव वैभव शिवतुरे, जितेंद्र केदार, श्री. मेढे उपस्थित होते.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या युवकांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करून प्रवेश देण्यात आला तसेच नूतन कार्यकारिणीबाबत इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यात जितेंद्र केदार, विशाल बागुल, प्रमोद इंगळे, वैभव शिवतुरे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: औरंगाबाद : व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी २२ अर्ज

आघाडीची पदाधिकारी व कार्यकर्त्याबाबतची आदर्श नियमावली स्पष्ट करण्यात आली. तसेच मेळाव्यात पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त संख्येने उमेदवार देऊन स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला. निवडणुकांसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी विशाल बागुल, अनिल लोंढे, राजू सोनवणे, किशोर रायसाकडा, प्रमोद सोनवणे, नीलेश मराठे, अनिल येवले, हेमंत विसपुते, गणेश रावळ, प्रवीण बोरसे, कुंदन बेलदार, गणेश शिंदे, श्री. गिरी आदी उपस्थित होते. मुलाखती व मेळावा सुमारे दोन तास चालला. मेळाव्याचे आयोजक विशाल बागुल यांनी प्रास्ताविक केले. शांताराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद सोनवणे यांनी आभार मानले.

loading image
go to top