
जळगाव : जिल्हा पोलिस दलातील ताकद असलेल्या पोलिस मुख्यालयातच ड्यूट्यांसाठी हजेरीमास्तर मनमानी कारभार करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सर्व हजेरी मास्तरांचीच हजेरी घेत बदल्या करून टाकल्या आहेत. (Deputy Superintendent of Police Sandeep Gavit transferred all attending masters for being absent jalgaon news)
जिल्हा पोलिस दलात कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांच्या तीस टक्क्यांवर पोलिस फोर्स मुख्यालयात असतो. रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथकासह इतर कामांसाठी राखीव असलेले आणि खातेअंतर्गत कारवाई, शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यावर याच ३० टक्के पोलिस फोर्सवर सर्वकाही अवलंबून असते.
त्याचप्रमाणे विविध व्हीआयपी बंदोबस्त, जेल रिलीज पार्टी, शासकीय कार्यालयातील बंदोबस्त अशा विविध कामांसाठी हे कर्मचारी वापरले जातात. असे असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण होते.
मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना सोयीच्या ड्यूट्या लावणे, कमाईच्या ठिकाणी ड्यूट्या देणे, अशा विविध प्रकारच्या तक्रारी या हजेरी मास्तरांसंदर्भात होत्या. या तक्रारींची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दखल घेतली. पोलिस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित यांच्या आदेशाने सर्व हजेरी मास्तरांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले.
आदेशात नेमके काय
ड्यूटीवाटप संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य ड्यूटीवाटप अंमलदारांसह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून ड्यूटीवाटपाचे कामे काढून घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सहाय्यक फौजदार देवीदास वाघ यांच्याकडे मुख्य वाटपाची जबाबदारी असेल. त्यांना सुभाष धिरबक्षी, रज्जाक सय्यद सहकार्य करतील. तसेच परेड, पिटीपरेड व नवचैतन्य कोर्सचे व्यवस्थापन श्री. वाघ बघतील.
मातब्बर कर्मचारी गोत्यात
मुख्यालयाच्या ड्यूटी वाटपामध्ये होणारा झोल खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे. सेायीच्या ड्यूट्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून महिन्याला ५ ते ७ हजारांपर्यंत मागणी होत असल्याची ओरड कर्मचाऱ्यांकडून होत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गेल्या वर्षभरापासून नियुक्तीला असलेला कर्मचारी अद्याप कोणीच कसा बघितला नाही.
लाइन पिकेटच्या ड्यूटीसाठी म्हणा की, जेल रिलीज ड्यूटीसाठी हजेरी मास्तरला खूश केल्यावरच मनासारखी वागणूक मिळत असे. काही कर्मचारी महिन्याला ठराविक रक्कम देऊन ड्यूट्याच करत नसल्याचा गंभीर प्रकारही या मुख्यालयात होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.