जळगाव महापालिकेसह धरणगाव पालिकेला निधी

नगरविकास विभागाचा शासननिर्णय निर्गमित
Development Department Fund for Jalgaon Municipal Corporation and Dharangaon Municipality
Development Department Fund for Jalgaon Municipal Corporation and Dharangaon Municipalitysakal

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास खात्याकडून जळगाव महापालिकेस दोन कोटी ८० लाख रुपये, तर धरणगाव नगरपालिकेसाठी दोन कोटी २० लाख, अशा एकूण पाच कोटी रुपयांच्या कामांना गुरुवारी मान्यता देण्यात आली. याबाबत शासन निर्णय (जीआर) निर्गमित झाला आहे.

यात जळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाला मान्यता मिळाली असून, यात जिल्हा परिषद चौक ते बळीराम पेठ या अतिशय महत्त्वाच्या रस्त्याचा समावेश आहे. या निधीतून धरणगाव नगरपालिकेच्या अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या (वाढीव वितरण व्यवस्था) कामाला अतिरिक्त निधी मिळाला आहे. जळगावातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुन्हा महापालिकेला निधी मिळवून दिला असून, यासोबत धरणगावातील कामालाही अतिरिक्त बूस्टर डोस मिळाला आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वी ६३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. यासोबत महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी वाढीव निधीची मागणी केली होती. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला. राज्यातील महापालिकांना मूलभूत सोयी- सुविधांचा विकास करण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्या अनुषंगाने जळगाव महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेंतर्गत चार कामांसाठी दोन कोटी ८० लाख निधीस मंजुरी दिली आहे.

या कामांमध्ये शहरातील दत्त दिगंबर व गुलमोहर सोसायटी गट क्रमांक १५२/४१५२२ मधील रस्ते डांबरीकरण करणे (६२ लाख ८२ हजार रुपये), प्रभाग ११ पिंप्राळा गट क्रमांक १०१, मुंदडानगरमधील रस्ते डांबरीकरण करणे (एक कोटी ३५ लाख ९० हजार), प्रभाग ११ पिंप्राळा गट क्रमांक १०१, मुंदडानगरमधील आरसीसी गटार बांधकाम करणे, तसेच जिल्हा परिषद चौक ते बळीराम पेठ रस्ता डांबरीकरण करणे (८१ लक्ष २८ हजार), असे एकूण दोन कोटी ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील जिल्हा परिषदेचा मुख्य चौक ते बळीराम पेठ हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून, पुलाच्या कामामुळे हा रस्ता खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीची कधीपासूनच मागणी करण्यात येत होती.

जळगाव शहरासाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे अभिवचन मी शहरवासीयांना दिले असून, त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने आता वाढीव चार कामांना मान्यता मिळाली आहे. येत्या काळात अजून अन्य कामांना वेग येणार आहे. धरणगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अत्यावश्यक असणारा निधी मिळणार आहे.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com