Devgiri Short Film Fest : ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट Short Film; ‘ये गावं मेरा’ला उत्कृष्ट महितीपट पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devgiri Short Film Festival

Devgiri Short Film Fest : ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट Short Film; ‘ये गावं मेरा’ला उत्कृष्ट महितीपट पुरस्कार

जळगाव : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे देवगिरी शॉर्टफिल्म महोत्सव बेंडाळे महिला महाविद्यालय परिसरातील (स्व.) विक्रम गोखले चित्रनगरीत झाला. यात ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ठ शॉर्टफिल्म ठरली.

उमेश घेवारीकर यांना उत्कृष्ट दिगदर्शकाचा पुरस्कारही पटकावला. उत्कृष्ट माहितीपट ‘ये गावं मेरा’ ठरला. दिग्दर्शक हरीश पटेल होते. (Devgiri Short Film Festival Bhai Ka Badde Best Short Film Best Feature Film Award for Yeh Gaon Mera jalgaon news)

उत्कृष्ट कॅम्पस फिल्म : सुकल्या-नितीन निकाळे, उत्कृष्ट मायबोली लघुपट- द दप्तराचा, दिग्दर्शक पराग चौधरी यांनी पुरस्कार पटकावला. दोनदिवसीय महोत्सवात ९२ पेक्षा जास्त शॉर्टफिल्म, डाक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, मायबोली लघुपट दाखल झाले होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे, अभिनेता आरोह वेलणकर, दिग्दर्शक शंतनू रोडे, माहितीपट निर्माते चंद्रशेखर कुलकर्णी, संस्थेचे संचालक प्रा. व. पु. होले, प्रा. एल. व्ही. बोरोले, प्राचार्या डॉ. गौरी राणे, विनीत जोशी, संजय हांडे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.

डॉ. जयेंद्र लेकुरवाळे व किरण सोहळे यांनी सूत्रसंचालन केले. विनीत जोशी यांनी आभार मानले. महोत्सव यशस्वितेसाठी महाविद्यालयातील फिल्म मेकिंग आणि ड्रमा विभाग, सेंटर फॉर मास मीडिया विभाग, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी विभाग, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पुरस्कार मिळालेले फिल्म्स

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- प्रथम ‘भाई का बड्डे’ दिग्दर्शक उमेश घेवारीकर, द्वितीय ‘पाखर’ दिग्दर्शक सतीश धुतडमल, तृतीय ‘द इंडिपेंडन्स डे’ अक्षय भांडवलकर, उत्तेजनार्थ ‘हप्पी वूमन्स डे’ दिग्दर्शक रोहित चव्हाण.

स्पेशल ज्युरी अवॉर्ड : ‘अलार्म घडी’ दिग्दर्शक शुभम शर्मा.

सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म : प्रथम ‘सुकल्या’ दिग्दर्शक नितीन निकाळे, द्वितीय ‘टेक ईट ईजी’ दिग्दर्शक संजय भोसले, एमजीएम स्कूल ऑफ फाईन आर्ट.

सर्वोत्कृष्ट महितीपट/डोक्युमेंटरी : प्रथम ‘ये गांव मेरा’ दिग्दर्शक हरीश पटेल, द्वितीय ‘सुश्रुत ऑफ मॉडर्न इंडिया’ दिग्दर्शक अविज्ञान किशोर दास, तृतीय ‘ऑपरेशन उमरी बँक’ दिग्दर्शक भरत वाळके.

सर्वोत्कृष्ट मायबोली लघुपट : ‘द दप्तराचा द’ दिग्दर्शक पराग चौधरी व दिगंबर चौधरी, उत्तेजनार्थ ‘लोकमान्य बाप्पा’ दिग्दर्शक विशाल जाधव व रमेश जाधव.

उत्कृष्ट पटकथा : ‘महासत्ता’ लेखन स्वप्नील मुंगे.

उत्कृष्ट छायांकन : ‘भाई का बड्डे’ आकाश बनकर,

उत्कृष्ट बालकलाकार : ‘द दप्तराचा द’ यादवी चौधरी,

उत्कृष्ट अभिनेता : ‘पाऊस' अथर्व बंगाळे,

उत्कृष्ट अभिनेत्री : ‘कल्पना’ विदुला बाविस्कर,

उत्कृष्ट दिग्दर्शन : ‘भाई का बड्डे’ उमेश घेवरीकर.