PM Poshan Shakti Nirman
PM Poshan Shakti Nirmanesakal

PM Poshan Shakti Nirman : शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत स्नेहभोजन उपक्रम

Jalgaon News : भारत सरकारचा शंभर दिवसांचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्नेहभोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
Published on

गणपूर (ता. चोपडा) : शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, कुपोषणमुक्ती व्हावी, यासाठी राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचा उद्देश ठेवून ऐच्छिक स्वरूपात ‘स्नेहभोजन’ उपक्रम सुरू करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना दिल्या आहेत. (snehbhojan under PM Poshan Shakti Yojana in schools)

भारत सरकारचा शंभर दिवसांचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्नेहभोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. माध्यान्न भोजन योजनेव्यतिरिक्त नवीन शैक्षणिक वर्षात तीन महिन्यांत किमान एक दिवस शाळेत स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी करावी, असे या पत्रकात नमूद केले आहे.

गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण व अमृतमहोत्सव, जन्मशताब्दी, लग्न समारंभ, धार्मिक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण आदी उपक्रमांतर्गत याचा समावेश केला असून, हे आयोजन शाळेने करावयाचे आहे. त्यासाठी काही बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. (latest marathi news)

PM Poshan Shakti Nirman
NCP Sunil Tatkare : जनतेचे व्यापक हित जपत विकासाचा निर्णय : प्रदेशाध्यक्ष तटकरे

शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार सुकामेवा, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ते, मनुका, अक्रोड, बेदाणे, शिजवलेले पदार्थ आदींचा यात समावेश केला आहे. स्नेहभोजन उपक्रमांतर्गत रोख रक्कम न देता साहित्य पुरविण्यात यावे, असेही नमूद केले असून, या भोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सुचविले आहे. यासंबंधीच्या सूचना व माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने संबंधितांना दिल्या आहेत.

PM Poshan Shakti Nirman
Raj Thackeray In Pune: पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे कडाडले; अजितदादा, शरद पवारांनाही डिवचलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com