नंदुरबारचे जिल्हाधिकारी लाखात एक, पुरस्काराची रक्कम केली दान

नंदुरबारचे जिल्हाधिकारी लाखात एक, पुरस्काराची रक्कम केली दान
Summary

कोविडच्या काळात शाळा बंद पडल्या असून शिक्षण घेणे खूपच जिकरीचे होत चाललेले आहे , अशा परिस्थितीत गरीब विद्यार्थ्यांसाठी 'अक्षय्य शिक्षण अभियानाचा ' लाभ होईल अशी आशा ही डॉ भारुड यांनी व्यक्त केली आहे.

अमळनेर (जळगाव) : "देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे" या काव्यपंक्तीचा पार्श्वभूमीवर एका उच्च अधिकाऱ्याने आपल्याला मिळालेली पुरस्काराची (Awards) एक लाखाची रक्कम चक्क एका शैक्षणिक उपक्रमाला (educational initiative) दान करून आपल्या दातृत्वाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे उच्च अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (dr. rajendra bharud) हे आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (District collector of nandurbar dr. rajendra bharud has given lakhs of rupees to the educational initiative)

नंदुरबारचे जिल्हाधिकारी लाखात एक, पुरस्काराची रक्कम केली दान
हॉटस्पॉट ठरलेले जळगाव शहर नियंत्रणात.. केवळ सोळा नवे बाधित

भारतीय प्रशासकीय सेवेत काम करीत असताना डॉ. भारुड यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अरुण बोंगीरवार फांऊडेशन तर्फे "अरुण बोंगीरवार एक्सलन्स अवार्ड" हा मानाचा पुरस्कार नुकताच डॉ. भारुड यांना प्रदान करण्यात आला. "ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या माणसांमध्ये वाढलो ती नाती कधी विसरायची नसतात" हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत डॉ. भारुड यांनी नेहमीच आपल्या मातीशी असणारी नाळ आणि त्या नात्यांचे ऋणानुबंध स्वतःसोबत नेहमीच घट्ट बांधून ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. भारुड यांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची एक लाखाची रक्कम दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे सुरू असलेल्या "अक्षय्य शिक्षण अभियाना"साठी दिली आहे. या अभियानात खारीचा वाटा म्हणून त्यांनी ही रक्कम दिली आहे. कोविडच्या काळात शाळा बंद पडल्या असून शिक्षण घेणे खूपच जिकरीचे होत चाललेले आहे , अशा परिस्थितीत गरीब विद्यार्थ्यांसाठी 'अक्षय्य शिक्षण अभियानाचा ' लाभ होईल अशी आशा ही डॉ. भारुड यांनी व्यक्त केली आहे.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी लाखात एक, पुरस्काराची रक्कम केली दान
जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची मागणी निम्म्यावर

पुरस्काराची एक लाख रुपये रक्कम ही देणगी म्हणून दिली आहे, ही दातृत्वाची कृती अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. या दातृत्वामुळे समाजात सकारात्मकता पसरत असून अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.

असे आहे हे अभियान

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यासाठी, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे व मोबाईल व इतर सुविधा मिळत नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेतांना बऱ्याच आव्हानाना सामोरे जावे लागत आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण “अक्षय्य (न संपणारे)” राहावे यासाठी दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे लोकसहभागातून 'दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान' सुरु करण्यात आले आहे. यासाठी रतनलाल सी बाफना ट्रस्ट (जळगाव) हाय मीडिया लॅबरोटरी (ठाणे) व पुखराज पगारिया फाउंडेशन (जळगाव) यांचे सहकार्य या अभियानाला मिळत आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणीची असलेले सुमारे 200 गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी व अनाथ विद्यार्थी यांची निवड करण्यात येईल, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी, अँड्रॉइड मोबाईल, परिक्षा फॉर्म फी/ट्यूशन फी, पुस्तके देण्यात येणार आहे.

(District collector of nandurbar dr. rajendra bharud has given lakhs of rupees to the educational initiative)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com