दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा ; आरोग्य यंत्रणेची कोरोना बाबत सजगता

District Surgeon Dr. NC Chavan informed Employees are likely to get extension in terms of service period
District Surgeon Dr. NC Chavan informed Employees are likely to get extension in terms of service period

जळगाव : जिल्हा शासकीय रुग्णालय व तालुकास्तरावर कोरोना काळात भरण्यात आलेल्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना यापुढील काळात कामाच्या सेवेबाबत दिलासा मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबरपर्यत कामावर राहण्याबाबत आर्डर देण्यात आली होती. मात्र यापुढील काळात जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग बाधीत रुग्णांची संख्या व राज्यातील संख्या विचार करता त्या कर्मचाऱ्यांना सेवा काळाबाबत मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.सी.चव्हाण यांनी दिली. 

मार्चमध्ये कोरोना संसर्गाची लागण सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेला विविध पदांची भरती करावी लागली. त्यात डेटा एंट्री ऑपरेटर, कॉलींग सेंटरवर कामासाठी, बेडसाईड असीस्टंट, तात्पूरत्या बेसीसर नर्सेस, वार्डबाय आदी २०० पद मानधन तत्वावर भरण्यात आली होती. तेव्हा त्यांना २० नोंव्हेबरपर्यतची सेवेत घेण्याची आर्डर होती. आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने या तात्पूरत्या सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेतून बंद करण्याची भिती कर्मचाऱ्यांना आहे. त्या पाश्‍वर्भुमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी वरील माहिती दिली. 

दिवाळीच्या पर्वात अनेक जण परराज्य, जिल्हात जावून आल्याने कोरोना संसर्गाची लाट शक्यतो २५ नोव्हेंबरनंतर येऊ शकते. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीनंतर आता मंदिर, इतर प्रार्थनास्थळेही सुरू झाली आहे. जे-जे लॉकडाउन केले होते, ते सर्व अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे कोरोना रुग्णवाढीची भीती अद्यापही कायम आहे. यामुळे तात्पूरत्या सेवेतील कमचाऱ्यांना वेळेनुरूप कामावर ठेवले जाईल.
 
राज्यस्तरीय आरोग्य यंत्रणेच्या शक्यतेनुसार दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, चौदा हजार पाचशे बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत. 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डेडिकेटड कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्वच ठिकाणी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, पीपीई किट, इतर सुविधांची तयारी करण्यात आली आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर एकावेळी १४ हजार रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com