दिव्यांगांनी केले कळसुबाई शिखर सर | Divyang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Divyang
दिव्यांगांनी केले कळसुबाई शिखर सर

दिव्यांगांनी सर केले कळसुबाई शिखर

जळगाव - कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर असून ते चढणे सामान्यांनाही आव्हानात्मक आहे. मनोबलच्या दिव्यांग टीमने मात्र हे शिखर सर करून एक आगळेवेगळे साहसी दर्शन घडवून आणले आहे. अडचणींवर मात करून दिव्यांगांनी या शिखरावर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने चढाई केली आहे. सागरच्या नेतृत्वात मोहीम प्रज्ञाचक्षू असलेल्या सागर बोडके या तरुणाच्या मार्गदर्शनात दिव्यांगांनी ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील एकूण १४ दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

अन्‌ गाठला माथा सर्व विद्यार्थी ४ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता ५ हजार ४०० मीटर उंच अशा या शिखरावर जाण्यासाठी निघाले आणि रात्री ९.३० वाजता गडाच्या मध्यावर तंबू ठोकून त्यांनी मुक्काम केला. पुन्हा ५ डिसेंबरला पहाटे चढण्यास सुरुवात करून सकाळी ५.४५ ला त्यांनी शिखर माथा गाठला. सकाळी कळसुबाई मातेचे दर्शन त्यांनी घेतले.

प्रज्ञाचक्षू श्‍यामनेही गाठले शिखर श्याम मिश्रा हा विद्यार्थी दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही त्याने या शिखरावर चढाई केली. इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. यांचा होता सहभाग मनोबलचे श्याम मिश्रा, ईश्वर दहिफळे, कैलास जाधव, विजय पावरा, परसराम फड, चेतन लबडे, बालाजी हापसे, सागर मराठे, बोदामवाड महाजन, हुसेन शेख, सचिन गोरे, श्रीकांत लासूरकर, कमलेश पाटील, सागर साळुंके, शेखर सोळुंके, दीपस्तंभ कार्यालय प्रमुख योगेश सूर्यवंशी यांचा या मोहिमेत सहभाग होता.