Jalgaon News : अनोख्या दिवाळीने सैनिकांचे कुटुंबीय भारावले; सेवेबद्दल वीरांचा गौरव

Soldiers' families and dignitaries in the 'Diwali with Soldiers' families' activity organized by Bharat Development Council.
Soldiers' families and dignitaries in the 'Diwali with Soldiers' families' activity organized by Bharat Development Council.esakal

Jalgaon News : भारत विकास परिषदेच्या देशासाठी बलिदान दिलेल्या ‘दिवाळी सैनिकांच्या कुटुंबीयांसमवेत’ या उपक्रमामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांसोबतच मान्यवरही भारावून गेले.

मायादेवी नगरातील रोटरी भवनात झालेल्या कार्यक्रमास तहसीलदार विजय बनसोडे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नौसेना अधिकारी हरीश यादव, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक उज्ज्वल चौधरी, क्षेत्रीय सचिव तुषार तोतला, अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील आदी उपस्थित होते.(Diwali with Soldiers families activities organized for soldiers family jalgaon news)

यांचा झाला गौरव

छाया वारुड, मीराबाई मनोरे, रत्‍नाबाई धनगर, ज्योती पाटील, प्रतिभा माळी, छायाबाई सोनवणे, सुरेखा देशमुख, रमेश पवार, भावना पाटील, सुनंदा पाटील, कविता जाधव या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा श्रीफळ, साडी, दिवाळी फराळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

वीरमाता, पत्नींकडून औक्षण

कार्यक्रमात सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींनी प्रमुख पाहुण्यांसह भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चौरंगावर बसून भाऊबीज म्हणून औक्षण केले. भावाच्या ममतेने या मान्यवरांनी त्यांना ओवाळणी दिली. या वेळी संपूर्ण वातावरण भावस्पर्शी झाले होते.

सैनिकांमुळेच सुरक्षित दिवाळी साजरी करतो

प्रमुख पाहुणे तहसीलदार विजय बनसोडे यांनी सैनिकांमुळेच आपण सुखाची दिवाळी साजरी करीत असतो. मात्र शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भारत विकास परिषदेने आठवण ठेवली. यामुळे त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता आल्याची भावना व्यक्त करत शक्यतो सैनिकाच्या घरात सैन्यात जाण्याची परंपरा असते. मात्र राजकीय व्यक्तीची मुले कधीही सैन्यात जात नाहीत, असेही ते म्हणाले.

Soldiers' families and dignitaries in the 'Diwali with Soldiers' families' activity organized by Bharat Development Council.
Jalgaon News : अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची बदली

सैनिकांच्या कुटुंबीयांमधून चिन्मयी पाटील, ज्योती पाटील, भावना पाटील, दिगंबर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष महेश जडिये यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. प्रांजली रस्से यांनी वंदे मातरम् गीत म्हटले. तुषार तोतला यांनी प्रास्ताविक केले. सुनील याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव उमेश पाटील यांनी आभार मानले.

प्रेरणादायी सजावट

व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांचे चित्र आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ या संदेशासह सैनिकांच्या परिवाराला मानाचा मुजरा करण्यात आला. सभागृहात सर्वत्र तोरण, लहान आकाशकंदील लावल्यामुळे दिवाळीच्या चैतन्य निर्माण झाले होते. सर्व शहीद जवानांचे छायाचित्र असलेला फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आला होता, तर जवानज्योत असलेली रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.

Soldiers' families and dignitaries in the 'Diwali with Soldiers' families' activity organized by Bharat Development Council.
Jalgaon News : भुसावळ रेल्वे मंडळाला 120 कोटींचा महसूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com