Jalgaon Crime : पतीच्या खुनातील महिलेस चार दिवस कोठडी; किरकोळ कारणावरून गुन्हा झाल्याची तपासात कबुली

आयुष्यभर दारूच्या नशेत मारझोड केली, कुटुंब सावरण्यासाठी मी, स्वतःकष्ट केले. मुलांना वाढवलं, आता त्याने राहत्या घराचाही सौदा केला, तरी त्याचा त्रास सुरूच होता.
Suspect Manisha Patil

Suspect Manisha Patil

sakal

Updated on

जळगाव - आयुष्यभर दारूच्या नशेत मारझोड केली, कुटुंब सावरण्यासाठी मी, स्वतःकष्ट केले. मुलांना वाढवलं, आता त्याने राहत्या घराचाही सौदा केला, तरी त्याचा त्रास सुरूच होता, अशी माहिती पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित मनीषा भरत पाटील या महिलेने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. भरत नामदेव पाटील (वय ५८ वर्षे, रा. केसीपार्क, जळगाव) असे मृत पतीचे नाव आहे. दरम्यान, संशयित मनीषा पाटीलला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्‍हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com