जळगा- उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ नये, यासाठी सतर्क राहावे, वीज जोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना वीज जोडणी द्यावी, जेणेकरून या योजना त्वरित कार्यान्वित होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू शकेल. अशा सूचना पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.