Jalgaon : महापालिकेच्या अनुकंपाधारक नियुक्तीला लेखापरीक्षण आकृतिबंध मंजुरीचा खोडा

Jalgaon municipal Corporation
Jalgaon municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : महापालिकेतील प्रतीक्षायादीतील अनुकंपाधारकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र याबाबत नियुक्त केलेल्या समितीने लेखापरीक्षण व कर्मचारी भरतीचा आकृतिबंध मंजूर झाल्याशिवाय ही भरती करता येणार नाही, असा अहवाल दिल्याने आता ही नियुक्ती लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेच्या प्रतीक्षायादीत असलेल्या अनुकंपाधारकांना दिवाळीपूर्वी नियुक्त करून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. समितीने विविध बाजूने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी (ता. १७) अहवाल सादर केला.(Draft of Audit Framework Approval Compassionate Appointment of Municipal Corporation Jalgaon News)

Jalgaon municipal Corporation
महापालिकेचे रस्तेदुरुस्तीसह प्रकल्प वांध्यात : रस्त्याचे ४२ कोटीही अडकले जनता त्रस्त

या अहवालात त्यांनी नमूद केले आहे, की महापालिकेचे झालेले विशेष लेखापरीक्षण निकाली निघाल्याशिवाय व आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्याशिवाय अनुकंपाधारकांची भरती करणे योग्य होणार नाही.

त्याशिवाय भरती करण्याचा प्रयत्न केल्यास विविध अडचणी निर्माण होतील, याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता अनुकंपा भरती थांबली असून, लेखापरीक्षणाची व आकृतिबंध मंजुरीची प्रतीक्षा अनुकंपाधारकांना करावी लागणार आहे.

Jalgaon municipal Corporation
Agriculture News : केळी विम्याच्या रकमेसाठी Ultimatum ; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com