
Jalgaon : कानळद्यात जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी
जळगाव : कानळदा (ता. जळगाव) येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या दोन गटांत हाणामारी झाली. तालुका पोलिसांत या प्रकरणी परस्परांविरोधात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कानळदा येथे विशाल मनोज पारधी (वय २६) वास्तव्यास असून, तो मंगळवारी (ता. ४) रात्री आठच्या सुमारास मंदिराजवळ उभा असताना, जुन्या भांडणाचे कारण उकरून काढत प्रमोद सोनवणे याच्यासह त्याच्या साथीदाराने चापटाबुक्क्यांनी तसेच लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केले.
विशालची आई भांडण सोडविण्यास गेली असता, तिलाही मारहाण केल्याची तक्रार जखमी विशालने दिली असून, प्रमोद सोनवणे व त्याच्या सोबतीला असलेल्या साथीदारांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.(Due to old dispute two groups clashed Kanalda Jalgaon Crime news)
हेही वाचा: Jalgaon : दहा हजारांच्या वसुलीवरुन मित्रानेच सौरभचा गळा चिरला!
दारूच्या नशेतील बडबड भोवली
प्रमोद सुभाष कोळी (वय ३७) याच्या वतीनेही क्रॉस कम्प्लेंट देण्यात आली असून, विशाल दारूच्या नशेत बडबड करीत होता. रिकामी बडबड करू नकोस, तिकडे जा, असे प्रमोद बोलला असता, त्याचा राग आल्याने विशाल पारधी, दीपक पारधी व मनोज पारधी या तिघांनी प्रमोदला फायटरने तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. या घटनेत प्रमोद जखमी झाला आहे. त्याच्या तक्रारीवरून विशाल, दीपक व मनोज (रा. कानळदा) या तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड तपास करीत आहेत.
हेही वाचा: Sawai Mahotsav : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान