Latest Marathi News | State Bankच्या दिरंगाईने पोलिसपाटलांची दिवाळी अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Bank of India

Diwali Update : State Bankच्या दिरंगाईने पोलिसपाटलांची दिवाळी अंधारात

पारोळा : तालुक्यातील पोलिसपाटलांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन शासनाकडे थकले होते. दिवाळीनिमित्त शासनाने तीन महिन्यांचे मानधन तातडीने मंजूर केले. परंतु स्टेट बँकेच्या दिरंगाईमुळे ते मानधन मिळू शकले नाही. त्यामुळे आता पोलिसपाटलांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

मानधन थकल्यामुळे संघटनेने पारोळा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे हा विषय मांडला असता, त्यांनी हा प्रश्न वरिष्ठांकडे मांडला व तातडीने तीन महिन्यांचे मानधन मंजूर करून घेतले. यासंदर्भात पोलिस ठाण्याच्या मुन्शी पालवे यांनी तातडीने हे बिल स्टेट बँकेत जमा केले.(Due to State Bank Delays Diwali of Police Patil is in darkness Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : दिवाळीत साफसफाईचे ‘तीन तेरा’; नगरसेवकांनी तक्रार करूनही ‘वॉटरग्रेस’ सुधरेना

परंतु बिल बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसपाटलांच्या खात्यात वर्ग केले नाही. आता २४ तारखेपर्यंत सुटी असल्याने हे पैसे वैयक्तिक खात्यावर जमा होणार नाहीत. त्यामुळे पोलिसपाटलांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, स्टेट बँकेच्या या गलथान कारभाराबद्दल पोलिसपाटील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

"पुढील तीन दिवस सुटी असल्याने शासकीय बिले प्रत्येक खात्याची काल अदा केली. परंतु पोलिसपाटलांच्या बिलासंदर्भात तांत्रिक अडचणी आल्यामुळे पेमेंट केले गेले नाही. ते येणाऱ्या बँकिंग दिवसांत अदा केले जाईल."

- अभिलाष बोरकर, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, पारोळा

हेही वाचा: Jalgaon: गुदाम व्यवस्थापकाकडून पुरवठा निरीक्षकाला मारहाणीचा प्रयत्न