Jalgaon News : केंद्रप्रमुखांच्या सतर्कतेने परीक्षेतील गोंधळ टळला; ‘साने गुरुजीं’च्या नावावरून लिफाफे चुकले

जिल्ह्यात यावल व अमळनेर येथे साने गुरुजींच्या नावावरून दोन नामांकीत शाळा आहेत.
Exam
Examesakal

Jalgaon News : जिल्ह्यात यावल व अमळनेर येथे साने गुरुजींच्या नावावरून दोन नामांकीत शाळा आहेत. या दोन्ही शाळा आजच्या ‘एनएमएमएस’च्या परीक्षेसाठी केंद्र होत्या, मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून चुकून सीलबंद पाकिटात प्रश्नपत्रिका व ‘ओएमआर’ शीटची अदलाबदल झाली.

पर्यायाने परीक्षा दोन तास उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले.(Due to vigilance of head of centre examination problem solve jalgaon news)

मात्र केंद्रप्रमुखांनी दाखविलेल्या तत्परतेने गोंधळ निस्तारला आणि उशिरा का होईना परीक्षा सुरळीत झाली. येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात (केंद्र क्रमांक- ३३१९) ‘एनएमएमएस’ परीक्षेचा पहिला पेपर साडेदहाला सुरळीतपणे सुरू झाला. मात्र, दुसऱ्या पेपरसाठी बारा वाजून पन्नास मिनिटांनी केंद्रप्रमुख सुनील पाटील व उपकेंद्र प्रमुख डी. के. पाटील यांनी सीलबंद केलेल्या खोक्यातील प्रश्नपत्रिका काढल्या.

त्यावेळी एका खोक्यात असलेल्या बारा ब्लॉगमधील प्रश्नपत्रिकाबरोबर आढळून आल्या. मात्र, दुसऱ्या खोक्यात आठ ब्लॉगच्या यावलच्या प्रश्नपत्रिका व ‘ओएमआर’ शीट आढळून आले. यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही (केंद्र क्रमांक- ३३१६) सीलबंद खोक्यात अमळनेरच्या प्रश्नपत्रिका व ‘ओएमआर’ शीट आढळून आले.

Exam
Jalgaon News : जिल्ह्याच्या महसुलात 28 टक्के वार्षिक वाढ : जिल्हाधिकारी प्रसाद

त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. केंद्रप्रमुख सुनील पाटील यांनी तत्परता दाखवत गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. शेख यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे संपर्क केला. विद्यार्थ्यांना परीक्षेला जास्त उशीर होणार नाही, यासाठी तत्काळ एक वाहन यावलकडे पाठवले.

त्याच वेळी यावलवरून दुसरे वाहन अमळनेरकडे रवाना झाले. दोघांची केंद्रस्थानी असलेल्या चोपडा येथे भेट झाल्यावर प्रश्नपत्रिकांची अदलाबदल करण्यात आली. १२ ब्लॉकमधील प्रश्नपत्रिका योग्य असल्या तरी पेपर फुटू नये यासाठी केंद्रप्रमुखांनी काळजी घेतली. त्यानंतर साडेतीनला पेपर सुरू झाला.

Exam
Jalgaon News : केळीचे 2 हजार घड माथेफिरूने कापून फेकले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com