Sand Smuggling News : अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर जळोदला पकडले

Amalner: Revenue officers and employees taking action against vehicles transporting illegal sand
Amalner: Revenue officers and employees taking action against vehicles transporting illegal sandesakal

अमळनेर : तापी नदीवरील जळोद येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर व एक ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून पोलिस ठाणे जमा केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीला जोर आला असून, महसूल पथकाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत. (Dumper tractor transporting illegal sand caught in Jalore action taken by revenue department Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Amalner: Revenue officers and employees taking action against vehicles transporting illegal sand
Sand Smuggling News : पोलिसांच्या आशीर्वादातून सोडले वाळूचे ट्रॅक्टर

शनिवारची सुट्टी असल्याची संधी साधत तापी नदीतून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच शनिवारी (ता. ४) पहाटे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी व्ही. पी. पाटील, मंडलाधिकारी चौधरी, तलाठी जितेंद्र पाटील, तलाठी ए. बी. सोनवणे, संदीप शिंदे, प्रकाश महाजन, सतीश शिंदे, भुपेश पाटील, मधुकर पाटील, प्रदीप भदाणे, तिलेश पवार, बळीराम काळे, वाय. आर. पाटील यांच्या पथकाला जळोद गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ सागर रमेश कोळी हा (एमएच १९, झेड १९७०) या डंपरमधून चार ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला.

तर पहाटे सिंधी कॉलनीजवळ घनश्याम दिगंबर चव्हाण हा ट्रॅक्टर (एमएच १९, बीसी ९९१) मधून एक ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याही ट्रॅक्टरचा पंचनामा करून पोलिस ठाण्याला जमा करण्यात आले.

Amalner: Revenue officers and employees taking action against vehicles transporting illegal sand
Sand Transport News : अवैध वाळू वाहतुकीला विरोध; तरुणाचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com