ed raids on rajmal lakhichand jewellers in jalgaon ajit pawar vs sharad pawar battle causes problem for ishwar jain
ed raids on rajmal lakhichand jewellers in jalgaon ajit pawar vs sharad pawar battle causes problem for ishwar jainesakal

Jalgaon Crime : राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ‘ईडी’चे छापे

‘ईडी’च्या या छापेमारीत ज्वेलर्समधील सर्व दागिन्यांचा साठा तसेच जवळपास ९० लाखांची रोकड ताब्यात
Published on

जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात, ‘ईडी’ने सलग दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य आस्थापनांवर छापे टाकले. तपासणीनंतर संचालक, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना समन्स बजावले आहे. ईश्‍वरलाल जैन यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

‘ईडी’च्या या छापेमारीत ज्वेलर्समधील सर्व दागिन्यांचा साठा तसेच जवळपास ९० लाखांची रोकड ताब्यात (सिज) घेतल्याचे सांगितले जात आहे. जैन पिता-पुत्रांनी या कारवाईविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरविले आहे.

काय आहे प्रकरण?

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांत सुमारे ५०० कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. चार टक्के व्याजाने घेतलेल्या या कर्जाला बँकेने वसूल करताना नियमबाह्यपणे व्याजदर वाढवून, अतिरिक्त कर लावून थकबाकीची रक्कम वाढवून दिल्याचा दावा ईश्‍वरलाल जैन यांच्याकडून केला जात आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com