एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

जिल्हाधिकारी राऊत : एड्स जनजागृतीपर पोस्टर्सचे प्रदर्शन
एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीsakal
Updated on

जळगाव : एड्स नियंत्रण कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे एचआयव्ही/एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. १९८८ पासून आजपावेतो जिल्ह्याची एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सांख्याकी माहिती पाहिली असता जळगाव जिल्ह्यात एड्स नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जागतिक एड्स दिन सप्ताहाचे उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
शिवाजीनगर : वडारवाडी वारंवार ड्रेनेज तुंबन्याचे प्रमाण वाढले

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. जी. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी प्रास्ताविकात एड्‌स नियंत्रणाबाबत केलेल्या कामाची माहिती दिली. एड्‌स नियंत्रण विभागातर्फे यंदा ‘असमानता संपवा, एड्स संपवा, महामारी संपवा’ हे घोष वाक्‍य असून प्रत्येक व्यक्‍तीने एड्स विषयक जास्तीत जास्त माहिती मिळविणे, एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपायांचे अनुकरण करणे, एचआयव्ही तपासणी करुन घेणे, त्यासंबधी औषधोपचार मिळविणे हा त्याच्या आरोग्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीने हा कार्यक्रम घेतला. दिशा बहुउद्देशीय संस्थेचे विनोद ढगे यांनी एड्स जनजागृतीपूर्वक पथनाट्य सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com