
जळगाव : घरासमोरील पेटत्या शेकोटीत पडून देवांशू सुनील सोनवणे (वय ८ महिने) हा बालक गंभीररीत्या भाजला गेला होता. नऊ दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्हा रुग्णालयात घडली. मृत बालक नांद्रा (ता. जळगाव) येथे खेळता- खेळता घराबाहेर निघाला अन् पेटत्या शेकोटीवर पडल्याने भाजला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.