Eknath Khadase I हिंदुत्वासाठी एकत्र आलाय, मग मंत्रीपदासाठी का भांडताय?, खडसेंचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आम्ही एकत्र आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केलाय - खडसे

हिंदुत्वासाठी एकत्र आलाय, मग मंत्रीपदासाठी का भांडताय?, खडसेंचा सवाल

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती लावण्याचा सपाटा सुरु केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना सोडली, हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आम्ही एकत्र आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. दरम्यान, जर आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्या मांडाला तर मग आता मंत्रीपदासाठी का भांडण करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. (Eknath Khadse news update) आज ते जळगावात बोलत होते.

यावेळी खडसे म्हणाले, मूळात हिंदुत्वाच्या मुद्यावर बाहेर पडून बंडखोर आमदारांनी भाजपशी युती केली की, उध्दव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे पक्ष सोडला? आमची विकास कामे होत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत असे त्यांच्याकडून सागंण्यात आले आहे. या आमदरांच्या पक्ष सोडण्याच्या कारणाबाबत कुठेही एकमत दिसलेलं नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्या महत्वाचा मानला तर आता या बंडखोर आमदारांनी मंत्रीमंडळात आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही, असं खडसेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा: शिंदे सरकारचा रोहित पवारांना झटका, कर्जतमध्ये आणलेल्या कामाला स्थगिती

पुढे ते म्हणाले, हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. मग त्यासाठी मंत्री कशाला व्हायला पाहिजे. त्यामुळे या बंडखोराचा हिंदुत्व हा केवळ सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. त्यांचे पक्षातून बाहेर पडण्याचे अनेक वेगवेगळे मुद्ये असल्याने त्यांच्या कोणतेही एकमत नसल्याचे दिसत आहे. आता त्यांनी पक्षातून बाहेर पडल्याचे कारण सांगतांना एकमत करण्याची गरज आहे, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना दिलेल्या स्थगितीबाबत खडसे म्हणाले, कोणतेही नवीन सरकार आले तर ते जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देते. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास दिलेली स्थागिती दिलेली तात्पुरती असावी असे मला वाटते. कारण हे प्रश्‍न अत्यंत भावनिक असतात. त्यामुळे हे निर्णय सरकारला परत घ्यावे लागतील, असे माझे मत आहे, असंही खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: 'आघाडी सरकारची सत्ता गेल्याचं सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसतंय'

Web Title: Eknath Khadse Criticized To Rebel Shiv Sena Mla Why Disputes For Minister In Shinde Govt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..