Eknath Khadse : चिखलीत ‘भारत निर्माण’च्या कामांमध्ये गैरव्यवहार : एकनाथ खडसे

Eknath Khadse Demand action with inquiry in Malpractice in chikhali Bharat Nirman workers jalgaon news
Eknath Khadse Demand action with inquiry in Malpractice in chikhali Bharat Nirman workers jalgaon newsesakal

Eknath Khadse : चिखली (ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) येथे भारत निर्माण योजनेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकारणी उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद उपविभाग, मुक्ताईनगर यांनी केलेल्या चौकशीत सुमारे १७ लाखांच्या रकमेची तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत आमदार एकनाथ खडसे यांनी चिखली येथे भारत निर्माणच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. ( Eknath Khadse Demand action with inquiry in Malpractice in chikhali Bharat Nirman workers jalgaon news)

यासंदर्भात खडसे म्हणाले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांनी २७ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर यांना चौकशी अहवालाप्रमाणे रुपये १६लाख ९२हजार ६८ एवढी रक्कम संबंधित तांत्रिक सेवा पुरवठेदार तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती, चिखली (ता.मुक्ताईनागर, जि.जळगाव) यांचेकडून वसूल करणेबाबत तसेच वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यास आरआरसी किंवा फौजदारी कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. असे असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित करत चौकशीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी खडसेंनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse Demand action with inquiry in Malpractice in chikhali Bharat Nirman workers jalgaon news
Eknath Khadse : पंढरपूरच्या आमदार यात्री निवासाचे काम पूर्ण करावे; एकनाथ खडसेंची विधानपरिषदेत मागणी

गुलाबराव पाटलांचे उत्तर

या प्रश्नाला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. यासंदर्भात २१ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पत्रान्वये आर.आर.टी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, इस्लामपूर सांगली यांना त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करणेकामी नेमण्यात आले होते.

मात्र त्रयस्थ संस्थेबाबत संबंधित समिती सदस्य यांनी आक्षेप घेतल्याने त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करण्यासाठी सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांनी अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती नियोजन संकल्पचित्र व यंत्रणेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

Eknath Khadse Demand action with inquiry in Malpractice in chikhali Bharat Nirman workers jalgaon news
Eknath Khadse : ‘हतनूर’ पुनर्वसित 18 गावे सुविधांपासून दूर; एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत वेधले लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com