Eknath Khadse : वेग मर्यादेचे फलक नसल्याने महामार्गावर भुर्दंड; खडसेंनी मांडला विधानपरिषदेत मुद्दा

Eknath Khadse Latest News
Eknath Khadse Latest Newsesakal

Ekanth Khadse : तरसोद-चिखली (जि. जळगाव) या चौपदरी महामार्गावर वेग मर्यादेचे फलक लावण्याबाबत व पोलिसांकडून वेगमर्यादा उल्लंघन केल्याबद्दल अवाजवी दंड आकारण्यात येत असल्याबद्दल आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. (eknath Khadse raised issue in Legislative Council about no speed limit sign on highway jalgaon news)

आमदार खडसे म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात तरसोद-चिखली या नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेग मर्यादेचे कोणतेही फलक न लावता रस्ता वाहतूक पोलिसांकडून वाहनात बसविलेल्या ‘कॅमेरा स्पीड गन’ यंत्राद्वारे अवाजवी रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे.

वाहनधारकांना कोणत्याही सूचना नसताना अशाप्रकारे दंड आकारला जात असल्याने अनेक वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

असे असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने महामार्गावर ठिकठिकाणी वेग मर्यादेचे फलक लावण्याबाबत कोणती कार्यवाही केली? वेग मर्यादेचे फलक न लावत रस्ता वाहतूक पोलिसांकडून वाहनात बसविलेल्या ‘कॅमेरा स्पीड गन’द्वारे अवाजवी रक्कम दंड, म्हणून वसूल करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली, असे प्रश्‍न श्री. खडसे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse Latest News
Eknath Khadse : माध्यान्ह भोजन योजनेत राज्यात गैरव्यवहार; खडसेंची विधान परिषदेत ‘लक्षवेधी

‘सकाळ’नेही गेल्या काळात या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला.

मंत्र्यांचे उत्तर, पण तर्कसंगत नाही

या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. तरसोद-चिखली या नव्याने तयार झालेल्या चौपदरी महामार्गावर निविदा शर्तीनुसार वेग मर्यादेचे फलक लावले आहेत, तसेच गृह विभागाने कळविल्यानुसार जळगाव पोलिसांत महामार्ग, रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी इंटरसेप्टर वाहन उपलब्ध असून, वाहतूक पोलिसांकडून अवाजवी दंड आकारले जात नसून मोटार वाहन कायद्यान्वये निर्धारित दंड आकारण्यात येतात. हा राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अखत्यारित येतो, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.

Eknath Khadse Latest News
Ekanth Shinde: "ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा डॉ. एकनाथ शिंदेनी काढला"; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com