Eknath Khadse : मेगा रिचार्ज प्रकल्पास निधी द्यावा; खडसेंची विधानपरिषदेत प्रश्नाद्वारे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

Eknath Khadse : मेगा रिचार्ज प्रकल्पास निधी द्यावा; खडसेंची विधानपरिषदेत प्रश्नाद्वारे मागणी

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : तापी महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पास निधी उपलब्ध करून देण्याबाबत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. (Eknath Khadse raised question in Legislative Council regarding provision of funds for Tapi Maha Kaya Water Recharge Project jalgaon news)

या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, की तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत मंजूर असलेल्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशासाठी वरदान ठरणाऱ्या तापी महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाचा (तापी मेगा रिचार्ज स्कीम) नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व प्रकल्पाच्या कामास लागणारा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली, वा करण्यात येत आहे? तसेच लवकरात लवकर या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली.

प्रस्ताव तापी महामंडळाकडे : उपमुख्यमंत्री

याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले उत्तर देताना सांगितले, की या मेगा रिचार्ज योजनेच्या सर्वेक्षण, अन्वेषण व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम तसेच जीओग्राफिकल एरिअल सर्व्हे करण्याच्या कामास १२ मे २०१५ अन्वये रुपये २१.९३ कोटी रुपये किमतीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तथापि, ‘लायडर’ सर्वेक्षणाचे काम व अन्वेषणाचे काम व इतर अनुषंगिक बाबी अंतर्भूत करून रुपये ३१.३० कोटी किमतीचा द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांची मान्यता प्राप्त झाली आहे. हा प्रस्ताव तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून शासनास प्राप्त झाल्यांनतर त्यास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करण्यास येईल.

मेगा रिचार्ज योजनेचे अंदाजपत्रक २०२२-२३ दरससुचीनुसार सुधारित करून सविस्तर संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार संबंधित अभिकरण डब्लयूएपीसीओएस यांना वितरीत करण्यात आला आहे.

या योजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण या कामासाठी व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संबंधित अभिकर्त्यांना रुपये २२.४२ कोटी (जानेवारी, २०२३ अखेर) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.