Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप

Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप
Updated on

Eknath Khadse News : अतिरिक्त दराच्या निविदा स्वीकारणे, मर्जीतील मक्तेदारांना कामे देणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, क्षमता नसलेल्या मक्तेदारांच्या निविदा स्वीकारणे अशा प्रकारांमधून सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याबाबत आपण मंत्री, सचिवांकडे तक्रारी केल्या आहेत.

त्यात तथ्यही आढळून आले असून, हा गैरव्यवहार लपविण्यासाठी गिरीश महाजनांचा दबाव असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. खुद्द बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीच आपल्याकडे ही कबुली दिल्याचा दावाही त्यांनी केला. (eknath khadse statement about girish mahajan pwd corruption jalgaon news)

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांना खडसेंनी केलेल्या तक्रारींमुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप करीत जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत शिरीष चौधरीवगळता अन्य आमदारांनी खडसेंच्या निषेधाचा ठराव संमत केला होता. त्यासंदर्भात खडसेंनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

तक्रारीत तथ्य आढळल्याने बदली; पण पुन्हा नियुक्ती

खडसे म्हणाले, की या विभागात १५ वर्षांपासून प्रशांत सोनवणेनामक अभियंता कार्यरत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध कामांमध्ये सोनवणेंनी मोठ्या प्रमाणात अनियमतता व बेकायदा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून गैरव्यवहार केला आहे.

यासंदर्भात सुभाष दिनकर पाटील यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन त्यात तथ्य आढळल्याने सोनवणेंची नाशिक येथे बदली करण्यात येऊन त्या जागी रूपा गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी विदेश दौऱ्यासाठी अर्जित रजा घेतल्यावर जळगावचा प्रभारी कार्यभार सोनवणेंकडे पुन्हा देण्यात आला. नंतर त्यांनी तो सोडलाच नाही. राजकीय दबावातून सोनवणेंची पुन्हा जळगावातच कायमस्वरूपी बदली करण्यात आली.

कोट्यवधींचा गैरव्यवहार

जळगावात पुन्हा पदभार स्वीकारल्यावर पुन्हा या विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार सुरू झाला. मर्जीतील मक्तेदारांना कामे देणे, जादा दराच्या निविदा स्वीकारणे यासह अनेक प्रकार सुरू झाले आहेत.

Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप
Girish Mahajan News : संजय राऊत यांनी लढवावी ईशान्य मुंबईतून निवडणूक : गिरीश महाजन

या सर्व गैरव्यवहारांच्या संदर्भात आपण नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली. मात्र, बांधकाममंत्र्यांसह सरकारने या लक्षवेधीवरील चर्चेपासून पळ काढला. तीन दिवस मंत्री उत्तर द्यायलाही आले नाहीत.

आमदार किशोर पाटलांकडून तक्रार न करण्याची विनंती

सोनवणे आपल्याच जिल्ह्यातील अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल तक्रारी न करण्याबाबत आमदार किशोर पाटलांनी आपल्याला विनंती केली. मात्र, जी कामे चुकीची झाली आहेत, त्याविरोधात आपण आवाज उठविणारच, असे मी त्यांना बजावून सांगितले.

महाजनांच्या दबावामुळे चौकशी होत नाही

बांधकाम विभागातील अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या स्तरावरून चौकशी सुरू आहे, त्या चौकशीतही तथ्य आढळून आले. त्यासंबंधीचा अहवाल आपल्याकडे आहे.

याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव श्री. सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. शेवटी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी या तक्रारींच्या संदर्भात कारवाई, चौकशी करू नये म्हणून महाजनांचा दबाव असल्याची कबुली दिली, असा दावा खडसेंनी केला.

Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप
Eknath Khadse News : शिवसेनेने नव्हे, 2014 मध्ये भाजपने.... नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला एकनाथ खडसेंचे उत्तर

उद्विग्न झाल्यानेच खडसेंचे बेछूट आरोप : गिरीश महाजन

जळगाव याच अभियंता सोनवणे यांच्या नियुक्तीसाठी, त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी खडसे यांनी तीन वेळा त्या- त्या वेळी सरकारला पत्रे दिली आहेत. जोपर्यंत कमिशन मिळत होते, तोपर्यंत सोनवणे चांगले होते. कमिशन मिळणे बंद झाल्याबरोबर सोनवणे भ्रष्टाचारी झाले. सुरवातीपासून खडसेंची हीच शैली असून, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना ‘ब्लॅकमेल’ करून कामे न होऊ देणे हेच त्यांचे धंदे आहेत.

बोरसेनामक उपअभियंता यांच्या मतदारसंघात सलग २० वर्षे होता, त्यांच्या घरची कामे करीत होता. अशा प्रकारे विकासकामांमध्ये अडथळे आणले जात असतील तर ते आम्ही कसे चालू देणार? म्हणूनच खडसे ही कामे होऊ देत नाहीत, अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करतात म्हणून त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देऊ नका, असे आपणच रवींद्र चव्हाणांना सांगितले, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. खडसेंचे आरोप त्यांच्या उद्विग्नतेतून होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप
Eknath Khadse Anil Patil : खानदेशात राष्ट्रवादीत खडसे विरूद्ध पाटील; राष्ट्रवादीतील आजी-माजी मंत्री आमने-सामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com