Eknath Khadse News : गिरीश महाजनांनी आपल्याविरुद्ध लोकसभा लढवावी : एकनाथ खडसे

गिरीश महाजन तब्बल सहा टर्म आमदार राहिले आहेत.
Girish mahajan & Eknath Khadse
Girish mahajan & Eknath Khadseesakal

Jalgaon News : गिरीश महाजन तब्बल सहा टर्म आमदार राहिले आहेत. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्याविरुद्ध रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे. (Eknath Khadse statement of Girish Mahajan should contest Lok Sabha against him Jalgaon News)

जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की गिरीश महाजन मला लोकसभेला उभे राहा, असे म्हणतात त्यांनी ते मला सांगण्याची गरज नाही.

माझी उमेदवारी पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे रावेर लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली आहे. जर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला, तर आपणही निवडणूक लढविण्यास तयार आहोत, आपणही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांनीही पक्षातर्फे रावेरमधून आपल्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरावे, त्यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये.

महाजनांची ‘ईडी’ चौकशी करा

माझ्या संपत्तीची सरकारने ‘ईडी’, ‘सीबीआय’ चौकशी केली. माझ्या पत्नीची, मुलीची चौकशी केली, माझ्या जावयाला अटक केली. आजही मला त्रास दिला जात आहे. परंतु माझ्याविरुद्ध काहीही सापडलेले नाही.

माझ्याप्रमाणे गिरीश महाजन यांचीही चौकशी करा, जामनेर येथील एका व्यापाऱ्याने महाजन यांची ‘ईडी’कडे तक्रार केली आहे. ती प्रलंबित आहे, त्या आधारावर चौकशी करावी. त्यांच्याकडे जी आज संपत्ती आली आहे, ती कशी आली, याची एकदा चौकशी करावी, असे आवाहनही खडसे यांनी दिले.

Girish mahajan & Eknath Khadse
Jalgaon News : अनधिकृत भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालिसा लावणार; 5 दिवसांचा अल्टिमेटम

...तर रक्षा खडसेविरुद्धही लढणार

रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली, महाविकास आघाडीमधून आपल्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आपण रक्षा खडसे यांच्याविरुद्धही लढण्यात तयार आहोत. कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पक्ष म्हणून मी त्यांना मदत केलेली नाही, त्यांनीही कधी मला मदत केलेली नाही. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध लढणार आहे.

डॉ. केतकी पाटलांनी स्पष्ट करावे

जळगाव लोकसभा मतदारसंघातून ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसने उमेदवारी मागितली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसने दावा करणे त्यांचा हक्क आहे. जर काँग्रेसला ही जागा केली, तर आपण शंभर टक्के काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यासुद्धा पक्षातर्फे इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांना निवडून आणूच. परंतु डॉ. पाटील यांनी भाजपतर्फे इच्छुक असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Girish mahajan & Eknath Khadse
Jalgaon Damage Road: जळगाव- भुसावळ महामार्गावर खड्डेच खड्डे! रात्रीचे पथदिवे बंद, साइडपट्ट्या नाहीत

घरवापसीचा विचार नाहीच

भाजपचे नेते विनोद तावडे जुन्या भाजप नेत्यांना पक्षात जवळ करीत असल्याची चर्चा आहे. आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार काय? याबाबत बोलताना ते म्हणाले, की विनोद तावडे लोकसभेत भाजप उमेदवारांचा विजय व्हावा, यासाठी पक्ष भक्कम करीत आहे, हे निश्‍चित आहे.

त्यांचे आपले संबंधही चांगले आहेत. परंतु आपला भाजपने प्रचंड छळ केला आहे, माझ्या चौकशा केल्या आहेत. मला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आजही मला त्रास दिला जात आहे. त्यामुळे आपला भाजपमध्ये घरवापसी करण्याचा कोणताही विचार नाही.

Girish mahajan & Eknath Khadse
Jalgaon News : जिल्ह्यात 23 हजार 936 जनावरांची वंध्यत्व तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com