Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon News : ‘एमआयएम’ नगरसेवकांना नोटीस; पक्षविरोधी केले काम

Published on

Jalgaon News : महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेऊन भाजप उमेदवाराला मदत केल्याबद्दल एमआयएमच्या दोघा नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Election of municipal chairman Notice to MIM corporator for doing anti party work jalgaon news)

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसैन यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशान्वये पक्षाचे निरीक्षक खालिद शेख सईद यांनी रियाज अहमद अब्दुल करीम बागवान व श्रीमती सईदा बी. शेख युसूफ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापतिपदासाठी पक्षाकडून श्रीमती सुन्नाबी राजू देशमुख यांचे नाव सुचविण्यात आले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Municipal Corporation
Gulabrao Patil : स्वच्छतेत 50 टक्के गावे मॉडेल घोषित करा : गुलाबराव पाटील

मात्र, दोघा नगरसेवकांनी श्रीमती सईदाबी शेख युसूफ यांच्या नावाने नामनिर्देशन दाखल केले.

तसेच ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागेही घेतला. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका अंजनाबाई सोनवणे बिनविरोध झाल्या. याप्रकारे पक्षविरोधी काम केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : जळगावमध्ये या तारखांदरम्यान धान्य महोत्सव; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com