Jalgaon News : ‘जखम बेंबीला, मलम शेंडीला’

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : महापाकिलेतील सत्ताधारी गटाचे नगरसेवक बंटी ऊर्फ अनंत जोशी यांनी नगररचना विभागातील अभियंत्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केला. त्यामुळे आयुक्तांनी आरोपाची तत्काळ दखल घेतल्याचे दाखविले. मात्र, ‘जखम बेंबीला, मलम शेंडीला’ असा प्रकार केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. नगररचनाची तक्रार असताना, त्यांनी बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करून एकप्रकारे धूळफेक केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेतील नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप नगरसेवक बंटी जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे केला होता. अडीच लाख रुपये एका अभियंत्याने घेतल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

त्यांच्या या आरोपाची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी नगररचना व बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या बदल्यांचे आदेश त्याच रात्री जारी केले. त्यांनी नगररचना विभागातील आरोप झालेल्या ‘त्या’ अभियंत्यांची बदली केली, तर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बदली केली. काही अभियंत्यांचे पदभार बदलले. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली होती.

(Engineer transferred process Mismanagement in Municipal corporation complaint against Town Planning department but transfer of construction department Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : अवैध वाळूउपसा DPDCत गाजला; आमदार खडसे, सावकारे किशोर पाटील आक्रमक

आयुक्तांनी या बदल्या केल्यामुळे कारवाई केल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ही ‘धूळफेक’ असल्याची आता चर्चा आहे. ज्या नगररचना विभागावर आरोप झाले त्या नगररचना विभागाची मात्र सफाई झालीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणचे ‘चर्चेतील’ अभियंते मात्र अद्यापही तिथेच आहेत. त्यांच्या अधिकारात कोणताही बदल करण्यात आला नाही.

काही ‘अभियंत्यांवर’ आरोप असताना, त्यांना त्या विभागातच ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगररचना विभागावर कारवाई नव्हे, तर आशीर्वादच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त आता नगररचना विभागाची साफसफाई केव्हा करणार, याकडेही आता लक्ष लागले आहे.

"नगररचना विभागाच्या गैरव्यवहाराबाबत आपण जाहीरपणे आरोप केले आहेत. या विभागाला धाक बसून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, हीच आपली अपेक्षा आहे. त्यामुळे या विभागातील सध्या असलेल्या वादग्रस्त अभियंत्यांची बदली होऊन विभागाची साफसफाई होणे गरजेचे आहे."

-बंटी ऊर्फ अनंत जोशी, गटनेता, शिवसेना, जळगाव

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : न्यायालयात संशयिताच्या दिशेने दगडफेक; समाजाप्रती अपशब्दाचे पडसाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com